Onion Rate Agrowon
ॲग्रोमनी

Onion Market Rate : महाराष्ट्र सरकारला जमलं नाही ते तेलंगणा सरकारने केले, हैद्राबाद येथे कांद्याला चढे भाव

Onion Bajarbhav : सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कांदा तेलंगणातील हैद्राबाद येथे विक्री केला जात आहे.

Team Agrowon

Onion Production : नाशिकमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु कांद्याला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशातच कवडीमोल भावाने कांदा विकला जात असल्याने शेतकऱ्यांना कांदा शेतात कुजवण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर तेलंगाणा सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत म्हणून कांद्याची जादा दराने खरेदी सुरू केली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने शेतकऱ्यांना खूश करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे.

राज्यातील नाशिक येथील लासलगांव ही कांदा खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीत झालेल्या कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे दर ठरत असतात. सध्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कांदा तेलंगणातील हैद्राबाद येथे विक्री केला जात आहे. महाराष्ट्रात कवडीमोल भावाने विकला जाणारा कांदा हैदराबाद येथे प्रति क्विंटल १७०० ते १९०० रूपये दराने खरेदी केला जात आहे.

मागच्या दोन दिवसांत लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७००-९०० रुपये भाव मिळाला. मात्र तेलंगणातील बीआरएस सरकारकडून कांदा चढ्या भावाने विकत घेतला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

आगामी निवडणुका लक्षात घेऊन कांद्याला जादा दर देऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा ठसवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. राव हे महाराष्ट्रातील सभांमध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या तेलंगणा मॉडेलचे उदाहरण देत असतात. त्यांनी अबकी बार किसान सरकार हा नारा दिला आहे.

दरम्यान, बीआरएसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कांदा प्रश्नावर आंदोलन केले होते. महाराष्ट्राने कांद्याला चांगला भाव दिला नाही तर आम्ही तेलंगणामध्ये कांदा घेऊन जाऊ, त्या ठिकाणी आम्हाला चांगला भाव मिळेल, असे जाधव यांनी सांगितले होते.

दरम्यान शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही, त्यामुळे आता बीआरएस पक्षाच्यावतीने कन्नड येथून सोमवारी (ता. १२) चार ट्रक कांदा तेलंगाणा राज्यात रवाना करण्यात आला. या ट्रकला बी आर एस पक्षाचे गुलाबी झेंडे लावण्यात आले होते.

दरम्यान, तेलंगणात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याच्या बातमीची दखल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही घेतली. कांद्याच्या भावाच्या मुद्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

तसेच तेलंगणात कांद्याला चांगला दर मिळत असेल तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून तो तेलंगणात विकावा, अशीही मागणी पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT