Onion  Agrowon
ॲग्रोमनी

शेतकरी संघटनांचे कांदा दरप्रश्‍नी ‘रास्ता रोको’

देवळा येथे आंदोलन; आता महामार्ग अडविण्याचा इशारा

टीम ॲग्रोवन

नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी देवळा येथे ‘रास्ता रोको’ केले. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे या वेळी पाहायला मिळाले. २३ मेपर्यंत कांद्याच्या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही. नाफेडच्या कांदा खरेदीत पारदर्शकता आली नाही, तर महामार्ग अडवू, असा इशारा या वेळी देण्यात आला, अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी दिली.

दरम्यान, तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारत मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याच्या मुद्द्यावर गुरुवारी (ता.१९) देवळा बाजार समितीसमोर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना एकत्र आल्या. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सतत कांद्याचे भाव घसरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आत्महत्तेचे प्रमाण वाढत असल्याची वास्तविकता या वेळी मांडण्यात आली. सध्या कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

...अशा आहेत मागण्या

राज्य व केंद्र सरकारने हमीभावाने २५०० ते ३००० रुपये क्विंटलने कांदा खरेदी करावा, जानेवारी २०२२ ते आतापर्यंत विकलेल्या कांद्याला ५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे अनुदान द्यावे, नाफेडची कांदा खरेदी ही निकोप, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असावी. ही कांदा खरेदी उत्पादन खर्चावर आधारित हमाभावानेच व्हावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT