oil Rate
oil Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : खाद्यतेलाचे भाव पडल्यानं शेतकरी संकटात, मग फावतं कुणाचं?

Anil Jadhao 

Soybean Rate : यंदा सोयाबीन बाजाराला सोयापेंड दरानं आधार दिला. पण सोयातेलाकडून निराशा हाती आली. सोयातेलाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासून दबावात आले. केवळ सोयातेलच नाही तर सूर्यफूल आणि मोहरी तेलाच्या दरात मोठी घट झाली.

मागील दोन आठवड्यांचाच विचार केला तर सर्वच खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. पण याचा ग्राहकांना दिलासा मिळताना दिसत नाही.

आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील घाऊक बाजारात ज्या प्रमाणात तेलाचे भाव कमी झाले, त्या प्रमाणात ग्राहकांचे भाव कमी केले नाहीत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव मात्र उद्योगांनी कमी केले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाली. त्यामुळं देशातील दरही कमी झाले. पण आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या प्रमाणात दर कमी झाले त्याप्रमाणात देशातील ग्राहकांना दिलासा मिळाला नाही.

खाद्यतेल आयात स्वस्त होऊनही ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतायेत. पण आयात स्वस्त झाल्याचा फटका सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना बसतोय. सोयाबीनचे बाव दबावात आहेत. तर मोहरीच्या दरानं हमीभावाचाही टप्पा गाठला नाही. शेतकऱ्यांना आजही दरवाढीची अपेक्षा आहे.

मागील दोन आठवड्यांमध्ये खाद्येतलाचे भाव ५०० ते ७०० रुपयांनी कमी झाले. पण तेल विक्रेत्यांनी दर कमी केले नाहीत. त्यामुळं सरकारनं नाराजी व्यक्त केली.

सरकारनं साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएला आपल्या सदस्यांना दर कमी करण्यास सांगावं, असं सूचवलं. एसईएच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले तसे देशातही दर कमी होत आहेत.

मागील दोन आठवड्यांमध्ये देशातील बाजारात खाद्यतेलाच्या भावात मोठी घट झाली. पामोलिनचे भाव क्विंटलमागं ३५० रुपयांनी कमी झाले. तर सरकी तेल ५५० रुपयांनी स्वस्त झालं. भुईमुग तेलाचेही भाव ५०० रुपयांनी घटले.

सूर्यफूल तेलाच्या दरातही काही प्रमाणात नरमाई आली. पण मागील दोन आठवड्यांमध्ये देशातीलल बाजारात खाद्यतेल त्या प्रमाणात स्वस्त झाल नाही. तरचं आंतरराष्ट्रीय बाजारातील झालेल्या घटीचा पूर्ण फायदा देशातील ग्राहकांना मिळत नाही. विक्रेत्यांनी त्या प्रमाणात दर कमी केले नाहीत.

खाद्यतेलामध्ये सर्वाधिक भाव घटले ते मोहरी आणि सोयाबीन तेलाचे. देशातील बाजारात शेतकऱ्यांची मोहरी येत आहे. यंदा उत्पादन चांगलं झाल्यानं देशातील उत्पादन वाढणार आहे.

पण सराकरनं आयातीलाही पाघड्या घातल्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. मोहरी तेलाचे भाव कमी झाल्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होतोय.

मोहरी तेलाच्या दारत सर्वाधिक घट

मोहरी तेलाचे भाव क्विंटलमागं ६५० रुपयांनी कमी झाले. २१ एप्रिल रोजी १०४० रुपयांवर असलेलं मोहरीचं तेल आता ९७५ रुपये प्रतिक्विंटलने मिळत आहे. मागच्या वर्षी हेच भाव १५५० रुपयांवर होते. शेतकऱ्यांची मोहरी बाजारात आल्यानंतरच दरात मोठी घट झाली. याचा परिणाम म्हणजे मोहरीचे दर आजही हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी आहेत.

सोयातेलात पुन्हा घसरण

सोयाबीन तेलाचे भावही मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं ६०० रुपयाने कमी झाले. २१ एप्रिल रोजी सोयातेलाचे भाव प्रतिक्विंटल १०३५ रुपयांवर होते. ते सध्या ९७५ रुपयांवर आहेत. पण मागीलवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन तेलानं १६५० रुपयांचा टप्पा गाठला होता.

म्हणजेच सध्याचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत क्विंटलमागं ६७५ रुपयांनी कमी आहेत. पण ग्राहकांना मात्र याचा पूर्ण फायदा होत नाही. सोयाबीनचे दर मात्र दबावात राहीले.

आयातशुल्क वाढीची मागणी

चालू हंगामात अगदी सुरुवातीपासूनच सोयाबीन तेलाचे भाव दबावात राहीले. पण सध्या हा दबाव खूपच वाढला. चालू हंगामात सोयाबीन दराला केवळ सोयापेंडचा आधार आहे. म्हणजेच सोयाबीन जे काही भाव मिळत आहेत, ते सोयापेंडला मिळणाऱ्या दरामुळं मिळत आहेत.

तेलाचे भाव कमी झाल्यामुळं सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. त्यामुळं सरकारनं आता खाद्यतेल आयातशुल्क वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे. सरकारनं मागील वर्षी खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपात केली होती.

यामुळंच आयात वाढली. शिवाय तेलाचे भावही पडले. सरकारनं खाद्यतेल आयातशुल्कात वाढ केल्यास सोयाबीन आणि मोहरी दरालाही आधार मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT