Soybean Rate
Soybean Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : अर्जेंटीनात दुष्काळ; सोयाबीन दर वाढणार?

Anil Jadhao 

Soybean Price : अर्जेंटीनात यंदा दशकातील गंभीर दुष्काळ पडला. त्यामुळं युएसडीएनं अर्जेंटीनातील उत्पादन यंदा ८० हजार टनांनी घटून ३३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

पण ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होईल, असं म्हटले आहे. तर चीनची सोयाबीन (Soybean) आयात वाढणार आहे. यामुळे देशातील सोयाबीन दर सुधारण्याची शक्यता आहे.

देशात मागील दीड महिन्यापासून सोयाबीन दर दबावात आहेत. सरासरी दरपातळी ५ हजार रुपयांपेक्षा जास्त राहिली. शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची विक्री मर्यादीत ठेवली. असं असूनही अपेक्षित भाव झाला नाही.

मागील एक महिन्यापासून सोयाबीन दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. पण शेतकऱ्यांकडील स्टाॅक पाहून आणि शेतकरी किती दिवस स्टाॅक ठेऊ शकतात? हे पाहून बाजार दबावात ठेवण्यात आल्याचं अभ्यासक सांगत आहेत.

आता युएसडीएच्या अहवालामुळेही देशातील सोयाबीन सुधारण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली. जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर असला तरी सोयातेल आणि सोयापेंड उत्पादनात अर्जेंटीना आघाडीवर आहे.

गेल्या हंगामात अर्जेंटीनात ४१० लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. पण यंदा दुष्काळाचा जबर फटका बसला. त्यामुळं उत्पादन ८० हजार टनांनी घटून ३३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला.

पण अर्जेंटीनातील व्यापारी संस्थांच्या मते उत्पादन २५० ते २८० लाख टनांच्या दरम्यान आहे. अर्जेंटीनातील सोयाबीन घटीचा आधार आंतरराष्ट्रीय बाजाराला मिळत आहे, असे शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं. 

दुसरीकडं ब्राझीलमधील उत्पादन यंदा २३५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात १ हजार २९५ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. ते यंदा १ हजार ५३० लाख टनांवर स्थिरावेल. ब्राझील सोयाबीन निर्यातीत आघाडीवर असतो.

यंदा ब्राझीलची सोयाबीन निर्यात जवळपास १५० लाख टनांनी वाढून ९२७ लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे.

चीनची आयात वाढणार

सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक चीन असतो. चीन यंदा सोयाबीन आयात ४५ लाख टनांनी वाढवणार आहे. चीनची आयात यंदा ९६० लाख टनांवर पोचेल.

चीनकडून सध्या सोयाबीनची खरेदी वेगाने सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारालाही आधार मिळाल्याचे शेतामाल बाजार अभ्यासक दिनेश सोमाणी यांनी सांगितले.

माॅन्सूनवर बाजाराचे लक्ष

यंदाच्या माॅन्सूनवर एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याची स्पष्टता एप्रिल महिन्यात येऊ शकते. एल निनोचा परिणाम झाल्यास पुढील हंगामातील उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं एल निनोबाबत स्पष्टता आल्यास सोयाबीनला मागणी वाढेल.

मार्च महिन्यात चढ उतार

देशात सध्या सोयाबीन बाजारात दर दबावात आहेत. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. आज देशातील बाजारात सोयाबीन आवक १ लाख ३५  हजार टनांच्या दरम्यान झाली होती. आवक कमी असूनही व्यापाऱ्यांनी दर वाढवले नाहीत.

मार्च महिन्यात सोयाबीन दरात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण तरीही सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये दर मिळायला हवा. तर सोयाबीनची सरासरी दरपातळी यंदा ५ हजार ते ६ हजार रुपये राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

अर्जेटीनातील दुष्काळामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढले. त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात वाढली. पण चालू महिन्यात सोयाबीन आवक वाढलेली दिसली. याचा दबाव दरावर आला. पण शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावं. सोयाबीनची विक्री किमान ५ हजार ५०० रुपयांच्या खाली करू नये.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT