Narendra Modi Agrowon
ॲग्रोमनी

Dairy Sector: डेअरी क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थकारणास चालना: नरेंद्र मोदी

सबर डेअरीचा (Sabar Dairy) विस्तार झाला असून शेकडो कोटी रुपयांचे नवे प्रकल्प उभारले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इथे दूध पावडर निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. गुजरातमधील डेअरी उद्योग क्षेत्राची उलाढाल १ लाख कोटींवर गेल्याचे मोदी म्हणाले.

Team Agrowon

भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात डेअरी क्षेत्राने मोठे योगदान दिले आहे. सबर डेअरीतील तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांच्या माध्यमातून सरकारला शेतकरी आणि दूध उत्पादकांना आर्थिक आधार देणे शक्य होणार आहे. ज्यामुळे ग्रामीण अर्थकारणास (Rural Economy) बळकटी मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.

गुजरातमधल्या सबर डेअरीतील विविध विकासकामांचे उद्घाटन आज (गुरुवारी) मोदी यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले. सबर डेअरीचा (Sabar Dairy) विस्तार झाला असून शेकडो कोटी रुपयांचे नवे प्रकल्प उभारले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इथे दूध पावडर निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. गुजरातमधील डेअरी उद्योग क्षेत्राची उलाढाल १ लाख कोटींवर गेल्याचे मोदी म्हणाले.

सबर डेअरीतील तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांच्या माध्यमातून सरकारला दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे शक्य होणार आहे. डेअरी क्षेत्रातील या विकासामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे सांगत मोदी यांनी डेअरी क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागाचा (participation of women) उल्लेख केला.

देशभरात स्थापन करण्यात येत असलेल्या १० हजार शेतकरी उत्पादक संघटनाही (Farmer Producer organisations) सक्रिय होताहेत. या संघटनांच्या माध्यमातून छोटे शेतकरी अन्न प्रक्रिया, मूल्यवृद्धी झालेल्या घटकांची निर्यात आणि पुरवठा साखळीशी जोडल्या जात असल्याचे मोदी म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी समर्पित भावनेने काम करत असून कृषी क्षेत्र असो की पशुसंवर्धन क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे मोदी म्हणाले. आज इथेनॉल पेट्रोल मिश्रणाचे १० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट गाठले आहे, ज्यामुळे आपली वाहने पर्यावरणपूरक मार्गाने फिरतील. २०१४ पर्यंत देशात ४० कोटी लिटरपेक्षा कमी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते.

आजमितीस हे प्रमाण ४०० कोटी लिटरवर गेले असल्याचे मोदी यांनी सांगितले. सरकारने ३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड्सचे (Kisan Credit Cards) वाटप केले असून मागच्या दोन वर्षांप-असून त्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत असल्याचे मोदी म्हणाले.

सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाबद्दल बोलताना मोदी यांनी, प्लास्टिक हे आपल्या जनावरांसाठी विष बनल्याचे सांगितले. जनावरांच्या पोटात १५ ते २० किलो प्लास्टिक आढळले आहे. त्यामुळेच सरकारकडून प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT