Cotton Production Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market: कापूस उत्पादन अंदाजाचा गोंधळ शेतकऱ्यांच्या मुळावर

Cotton Production : देशात यंदा नेमकं किती कापूस उत्पादन झालं याविषयी विविध संस्थांचे अंदाज वेगवेगळे आहेत. सीएआय आणि सीओसीपीसी या संस्थांच्या अंदाजात तब्बल ४५ लाख गाठींची तफावत आहे.

Team Agrowon

Cotton Rate Update : देशात यंदा नेमकं किती कापूस उत्पादन झालं याविषयी विविध संस्थांचे अंदाज वेगवेगळे आहेत. सीएआय आणि सीओसीपीसी या संस्थांच्या अंदाजात तब्बल ४५ लाख गाठींची तफावत आहे. सीएआयने यंदा २९८ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला.

तर सीओसीपीसीने ३४३ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे म्हटले आहे. सीओसीपीसीच्या अंदाजावरून शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याचे व्यापारी आणि उद्योग सांगतात. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो.

देशात सध्या कापूस उत्पादनाविषयीच्या आकड्यांचा गोंधळ सुरु असल्याचं दिसतं. मात्र या गोंधळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. देशात कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज वर्तविणाऱ्या दोन संस्था आहेत.

त्यात काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआय आणि कापूस उत्पादन आणि वापर समिती म्हणजेच सीओसीपीसी. पण या दोन्ही संस्थांच्या उत्पादनाच्या अंदाज यंदा मोठी तफावत आहे. त्यामुळे कापूस बाजारातील घटक आपल्या सोयीप्रमाणे अंदाज गृहीत धरून शेतकऱ्यांची कोंडी करताना दिसत आहेत.

काय आहे अंदाज?

सीओसीपीसीने यंदा देशात जवळपास ३४३ लाख टन कापूस उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त केला. तर सीएआयचा अंदाज २९८ लाख गाठींचा आहे. म्हणजेच दोन्ही संस्थांच्या अंदाजात तब्बल ४५ लाख गाठींची तफावत आहे.

पीक उत्पादनामध्ये एवढी मोठी तफावत असल्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. व्यापारी आणि उद्योग सीओसीपीसी या संस्थेचा अंदाज गृहीत धरून कापूस मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत.

राज्यनिहाय अंदाजातील तफावत

राज्यनिहाय विचार करता सर्वाधिक तफावत तेलंगणा राज्यातील उत्पादनाविषयी आहे. सीओसीपीसीच्या मते यंदा तेलंगणात ५३ लाख गाठी कापूस उत्पादन झाले. तर सीएआयच्या मते उत्पादन ३१ लाख टनांवर स्थिरावले.

म्हणजेच दोन्ही संस्थांच्या अंदाजात २२ लाख गाठींची तफावत आहे. तर महाराष्ट्राच्या अंदाजात ११ लाख गाठी आणि कर्नाटकाच्या अंदाजात साडेपाच लाख गाठींची तफावत दिसून आली.

कोण कसा अंदाज काढते?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका कुणाचा अंदाज खरा मानायचा? सीएआयचा की सीओसीपीसीचा? आधी दोन्ही संस्था कसा अंदाज काढतात ते पाहू. सीएआय कापूस उत्पादक राज्यातील जिनिंग उद्योगांच्या संघटनेकडून कापूस गाठींची माहिती घेत असते.

गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी कापूस उत्पादक राज्यांतील जिनिंग संघटना सीएआयला तयार झालेल्या कापूस गाठींची माहीती देतात. त्यावरून सीएआय आपला अंदाज देत असते. तर सीओसीपीसी पीक कापणी प्रयोगाच्या माध्यामातून आपला अंदाज जाहीर करते.

कुणाचा अंदाज अचूक मानायचा?

दोन्ही संस्थांच्या कापूस उत्पादनाचा अंदाज काढण्याच्या पद्धती लक्षात घेता अनेक जाणकार आणि अभ्यासक सीएआयचा अंदाज गृहीत धरतात. कारण हा अंदाज उद्योगांनी तयार केलेल्या कापूस गाठींवरून काढलेला असतो. म्हणजेच हा कापूस हाती आलेला असतो.

यंदा सीएआयने २९८ लाख गाठींचा अंदाज जाहीर केला आहे. तर आतापर्यंत जवळपास २५६ लाख गाठी कापूस बाजारात आला. म्हणजेच शेतकऱ्यांकडे आता कमी कापूस शिल्लक आहे.

बाजारातील परिस्थिती

मागील काही दिवसांपासून देशातील बाजारातील कापूस आवक कमी झाली. त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली. सध्या कापसाला ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

यापुढे बाजारातील आवक यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता नाही. म्हणजेच आवक कमी होत जाईल. त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Import Tarrif: आयातीचा उंट तंबूत नको

Uzi Fly Control: उझी माशीसाठी निसोलिनक्स थायमस वापर पर्यावरणपूरक

Agriculture Minister: ‘कृषी’च्या निधीसाठी आग्रह धरू : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Pannageshwar Sugar Factory: ‘पन्नगेश्वर’कडील शेतकऱ्यांची देणी कोण देणार?

Maharashtra Startup Policy: पन्नास हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT