Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी कॉटन मार्केट यार्डावर खासगी व्यापाऱ्यांमार्फत यंदाच्या (२०२२-२३) हंगामात जाहीर लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी सुरू आहे. मोसमी पावसाचे आगमन होणार आहे.
कॉटन मार्केट यार्डावर तसेच जिनिंगमध्ये कापूस साठवणुकीसाठी निवारे (शेड) सुविधा नाहीत. त्यामुळे बुधवारी (ता. २१) कापूस खरेदी बंद करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी मंगळवार (ता. २०)पर्यंत कापूस विक्रीसाठी आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी कॉटन मार्केट यार्डावर नोव्हेंबर महिन्यात जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस सुरू झाली. आजवर सुमारे दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली.
बाजार समिती यार्डावर कापूस घेऊन आलेली वाहने थांबण्यासाठी निवारे नाहीत. कार्यक्षेत्रात यंदा सुरू असलेल्या जिनिंगमध्ये देखील निवारे नाहीत. त्यामुळे पावसामुळे कापूस भिजून कापसाची प्रतवारी खराब होऊन कमी दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदाच्या हंगामात कापसाच्या बाजाराभावात चढ-उतार होत आहेत. परभणी बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांनी शेतीमालाची प्रतवारी करुन आणल्यास बाजारभावाबाबत कोणतीही तक्रार उद्भविणार नाही. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांकडे अजून कापूस शिल्लक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.