Cotton Seed Selling : कापूस बियाणे चढ्या दराने विकणाऱ्या सहा दुकानांचे परवाने निलंबित

Cancellation of Agricultural Vendor Shop License : बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केलेले आहे.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon
Published on
Updated on

Nagar News : खरीप हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर बियाणे विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे विक्रीची लगबग सुरू झाली असून कापसाच्या बियाण्यांची चढ्या दराने विक्री होत असल्याचे उघड झाल्याने नगर जिल्ह्यात सहा कृषी केंद्राचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केलेले आहे. जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे.

Cotton Seed
Fertilizer Selling : खतांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुकास्तरावर १ अशी एकूण १५ भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत केलेली आहेत. तपासणीत कापूस बियाण्यांची चढ्या दराने विक्री केल्याचे आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्रांचे व २ कीटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केली गेली आहेत.

निलंबित केलेली कृषी केंद्रे

संजीवन कृषी सेवा केंद्र, करजगाव (ता. नेवासा), २) सद्‌गुरू कृषी सेवा केंद्र, सोनई (ता. नेवासा), जगदंबा कृषी सेवा केंद्र, घोडेगाव (ता. नेवासा), बळीराजा अॅग्रो सर्व्हिसेस, कौटा (ता. नेवासा), किसान कृषी सेवा केंद्र, वळण (ता. राहुरी), अक्षमला सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com