Soybean Market Rate Update : जागतिक सोयाबीन बाजारात चीनचे वजन मोठे आहे. त्यामुळे चीनच्या निर्णयाचा बाजारावर लगेच परिणाम होत असतो.
युएसडीएच्या मते यंदा चीनची सोयाबीन आयात काहीशी कमी होईल. चीन यंदा ९१० लाख टन आयात करेल. मात्र यंदाच्या पहिल्या तिमाहीत सोयाबीन आयात १४ टक्क्यांनी वाढली आहे.
चीन सोयाबीनचा जगातील आघाडीचा ग्राहक आहे. त्यामुळे सोयाबीन बाजाराचे लक्ष सतत चीनकडे असते. चीनच्या धोरणाचा सोयाबीन बाजाराकडे लक्ष असते. पण चीनची सोयाबीन मागणी काहीशी कमी होऊन कॅनोलाकडे वळू शकते, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभाग अर्थात युएसडीएने व्यक्त केला.
चीनचा सोयाबीन वापर १० लाख टनांनी कमी राहू ९१० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज युएसडीएने दिला. पण चीनची सोयाबीन आयात २०२३ च्या महिल्या तिमाहीत १४ टक्क्यांनी वाढून २३० लाख टनांवर पोचली.
चीनने मार्च महिन्यात विक्रमी सोयाबीन आयात केली. तर व्यापाऱ्यांना यंदा चीनची आयात जास्त राहण्याचा अंदाज आहे. चीनचा जागतिक सोयाबीन व्यापारातील वाटा ५८ टक्के आहे.
पण चीनच्या बाजारात सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचाही संशय काही जाणकार व्यक्त करत आहेत.
चीनच्या मागणीवरही परिणाम दिसत असल्याचं सांगितलं जातं. चीनच्या एक्सचेंज प्लॅटफाॅर्मवर सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये नरमाई दिसत आहे. मार्चच्या सुरुवातीपासून आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत दर कमीच होते.
काही वर्षांपर्यंत सोयाबीन उत्पादनात अमेरिका आघाडीवर होता. त्यामुळे चीन अमेरिकेकडून सोयाबीन आयात करत होता. त्यावेळी चीनच्या निर्यातीत ब्राझीलचा वाटा खूपच कमी होता. पण डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर चीन आणि अमेरिकेतील व्यापार युध्द सुरु झाले.
परिणामी चीनने हळूहळू ब्राझीलच्या सोयाबीनकडे मोर्चा वळवला. त्यामुळे ब्राझीलमध्ये सोयाबीन क्षेत्र वाढीलाही मदत मिळाली. आज ब्राझील जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. तर चीन ब्राझीलच्या सोयाबीनचा मोठा ग्राहक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.