Chana Procurement  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement : परभणीत हमीभावाने २ लाख ५९ हजार क्विंटलवर हरभरा खरेदी

Nafed Chana Procurement : राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर गुरुवार (ता. २५) अखेर नोंदणीकृत १८ हजार ६९५ पैकी ८ हजार ७६२ शेतकऱ्यांचा १ लाख ३६ हजार ७२५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

Team Agrowon

Parbhani Chana News : यंदाच्या (२०२२-२३) हंगामात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) वतीने परभणी व हिंगोली जिल्ह्यांत राज्य सहकारी पणन महासंघ (मार्क.फेड.) व विदर्भ सहकारी पणन महासंघ (व्हीसीएफ) अंतर्गत १८ खरेदी केंद्रावर गुरुवार (ता. २५) अखेर १६ हजार ६३५ शेतकऱ्यांचा २ लाख ५९ हजार ६०४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

आजवर एकूण १२ हजार २४१ शेतकऱ्यांना १०५ कोटी ८५ लाख ८६ हजार ७०५ रुपये एवढ्या रकमचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर गुरुवार (ता. २५) अखेर नोंदणीकृत १८ हजार ६९५ पैकी ८ हजार ७६२ शेतकऱ्यांचा १ लाख ३६ हजार ७२५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

या हरभऱ्याची किंमत ७२ कोटी ९४ लाख २९ हजार ६३५ रुपये आहे. हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रांवर नोंदणीकृत ११ हजार ५४ पैकी गुरुवार (ता. २५) अखेर नोंदणीकृत ११ हजार ५४ पैकी ७ हजार ३१५ शेतकऱ्यांचा १ लाख १२ हजार ८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

या हरभऱ्याची एकूण किंमत ६० कोटी २० लाख ५ हजार २४१ रुपये होते अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड (जि. परभणी) येथील केंद्रावर नोंदणीकृत १ हजार ५८८ शेतकऱ्यांपैकी ५५८ शेतकऱ्यांचा १० हजार ३८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

१०५ कोटी ८५ लाखांवर चुकारे अदा...

पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील खरेदी केलेल्यापैकी १ लाख १३ हजार ६५८ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला. आजवर एकूण ६ हजार १७४ शेतकऱ्यांना १ लाख ४ हजार ३०० क्विंटल हरभऱ्याचे ५५ कोटी ६४ लाख ४० हजार ५०० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ९८ हजार १०७ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे. आजवर ५ हजार ८१४ शेतकऱ्यांना ८९ हजार ४८७ क्विंटल हरभऱ्याचे ४७ कोटी ७४ लाख १३ हजार १४५ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या गंगाखेड केंद्रांतर्गत २५३ शेतकऱ्यांना २ कोटी ४७ लाख ३३ हजार ६० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.

हरभरा खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्राचे नाव- शेतकरी संख्या- हरभरा खरेदी

परभणी - ९७८- १६९१५

जिंतूर - ४९४ - ७३५२

बोरी - १३६५ - २२०१९

सेलू - १०९५ - १६३५३

मानवत- ११३३ - १७०४२

पाथरी - १४७० - २२५३६

सोनपेठ - ९७०- १५५००

पूर्णा - १२५७ - १९००६

गंगाखेड - ५५८- १००३८

हिंगोली - १७६७- २६१५६

कनेरगाव - ८१०- १३३७६

कळमनुरी- १२६५ - २०२३८

वसमत - ५०९ - ७७११

जवळा बाजार - १५२७- २१८१३

सेनगाव - ८९३- १४७३३

साखरा - ३४३- ५३५८

येळेगाव - ६०- ११२४

वारंगा - १४१ - २३२९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT