Dragon Fruit
Dragon Fruit Agrowon
ॲग्रोमनी

Dragon Fruit Cultivation : ड्रॅगन फ्रुटसाठी केंद्राचा पुढाकार

Team Agrowon

केंद्र सरकारने येत्या पाच वर्षांत ५० हजार हेक्टर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) लागवडीचा संकल्प सोडला. मानवी शरीराला आवश्यक पोषक घटकांचा समावेश असणारे ड्रगन फ्रुट हे सुपर फ्रुट (Super Fruit) समजले जाते. जगभरातील ड्रॅगन फ्रूटची वाढती मागणी आणि कमी उत्पादन खर्चामुळे केंद्र सरकारने ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला.

आजमितीस देशभरात ३ हजार हेक्टर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतले जाते. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार येत्या पाच वर्षांत हे क्षेत्र ५० हजार हेक्टरपर्यंत वाढवत नेण्याची सरकारची मनीषा आहे. अलीकडेच गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रुटचे 'कमलम' (kamlam) असे नामांतर केले असून त्याच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. गुजरातपाठोपाठ हरियाणा सरकारनेही या अनोख्या फळाच्या उत्पादनवाढीस चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

या फळात इतर फळांच्या तुलनेत कॅलरी कमी असतात, त्यामुळे मधुमेहाचा आजार असलेल्यांना हे फळ चालू शकते. याशिवाय या फळात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक असे पोषक घटक आहेत. मानवी शरीराला आवश्यक पोषक घटकांची पूर्तता या फळातून होऊ शकते. या फळाला जगभरात चांगली मागणी आहे.

जागतिक आणि देशांतर्गत बाजारात या फळाला मोठी मागणी आहे. ही मागणी कायम राहणारी असून शेतकऱ्यांना मिळणारा मोबदलाही चांगला आहे. विशेष म्हणजे हे फळ शुष्क प्रदेशात, कमी पाण्यातही घेता येणे शक्य आहे. त्यामुळेच येत्या पाच वर्षात ५० हजार हेक्टर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट सहज साध्य होण्यासारखे असल्याचा विश्वास केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी गुरुवारी ( ७ जून) पार पडलेल्या ड्रॅगन फ्रुटवरील (Dragon Fruit) राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केला. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या (MIDH) माध्यमातून केंद्र सरकार ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी मदत करणार असल्याचेही आहुजा यांनी सांगितले.

या फळाच्या रोपाला फारसे पाणी लागत नाही, या फळाचे उत्पादन शुष्क, कोरडवाहू जमिनीवरही घेतल्या जाऊ शकते. शिवाय या फळाला दरही चांगला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा उत्तम आर्थिक पर्याय असल्याचे केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार म्हणाले.

ड्रगन फ्रुट उत्पादनात मिझोराम अव्वल

ड्रॅगन फ्रुट उत्पादन घेणाऱ्या राज्यांत सध्या मिझोराम (Mizoram) आघाडीवर आहे. मेक्सिकोमध्ये पिकणाऱ्या ड्रॅगन फ्रुटपेक्षा मिझोराममध्ये (Mizoram) पिकणारे ड्रॅगन फ्रुट वेगळे आहे. या फळाचे उत्पादन व्हिएतनाममध्ये होते. ड्रॅगन फ्रुटच्या निर्यातीमुळे व्हिएतनाममधील अर्थकारण मजबूत होत आहे.

व्हिएतनाममध्ये ६० हजार हेक्टर क्षेत्रात ड्रगन फ्रूटचे उत्पादन घेतले जाते. चीनमध्ये हे प्रमाण ४० हजार हेक्टर आहे. भारत सध्या १५४९१ टन ड्रॅगन फ्रुट आयात करतो. त्यामुळेच मिझोरामप्रमाणेच देशातील अन्य राज्यातही शेतकऱ्यांनी या पिकाचे उत्पादन घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चचे (Indian Institute of Horticultural Research) जी. करुणाकरन म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT