Cyber Security Agrowon
ॲग्रोमनी

ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी

ग्रामीण भागामध्येही काही प्रमाणात मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पसरू लागली. त्याच दरम्यान नोटाबंदी, कोरोना महामारी अशा संकटामुळे ऑनलाइन व्यवहारांना बळ मिळाले.

टीम ॲग्रोवन

ग्रामीण भागामध्येही काही प्रमाणात मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पसरू लागली. त्याच दरम्यान नोटाबंदी, कोरोना महामारी अशा संकटामुळे ऑनलाइन व्यवहारांना बळ मिळाले. मात्र या वाढणाऱ्या व्यवहारासोबतच फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाली. सायबर गुन्हेगारही सामान्यांना लक्ष्य करत आहेत. ऑनलाइन व्यवहार करताना पुढील बाबी लक्षात ठेवल्यास आपली बॅंक खात्यातील रक्कम सुरक्षित राहील.

१) सार्वजनिक वाय-फाय किंवा सायबर कॅफेमध्ये बॅंकिग व्यवहार टाळावेत. यामध्ये हॅकिंग होण्याची शक्यता असते. आपले लॉगइन आणि पासवर्ड चोरला जाऊ शकतो. ऑनलाइन पेमेंटसाठी तुमच्या खासगी वाय-फाय किंवा मोबाईल नेटवर्कचा वापर करावा. cache मेमरी त्यानंतर क्लिअर करावी.

२) वेबसाइट किंवा अॅपतर्फे कार्ड डिटेल्स सेव्ह करण्यासंदर्भात सुचवले जात असले तरी कधीही आपले कार्ड डिटेल्स सेव्ह करू नयेत. अनेक वेळा ब्राउझर कंपन्याकडूनही अशी विचारणा होती. बॅंकिंग संदर्भातील कोणताही पासवर्ड, कार्ड डिटेल्स सेव्ह करणे टाळावे. चुकून सेव्ह केली तरी त्वरित डिलिट करावी.

३) वेबसाइटच्या URL म्हणजे आपण वेबसाइटचे नाव इंग्रजीमध्ये लिहितो, त्याकडे लक्ष द्यावे.URL जर Http ऐवजी Https असावी. येथील S अर्थ वेबसाइट सुरक्षित असून, त्याद्वारे पेमेंट करू शकता. मात्र URL मध्ये S दिसत नसल्यास त्या वेबसाइटवर ऑनलाइन व्यवहार अजिबात करू नये. वेबसाइट सर्च करून शोधण्यापेक्षा पूर्ण अक्षरे स्वतः टाइप करून वेबसाइटवर जावे. अन्य लिंक्स क्लिक करणे टाळावे.

४) बॅंकिंग वेबसाइटच्या लॉगिन व पेमेंटसाठी मजबूत पासवर्ड वापरावेत. पासवर्डस वेळोवेळी बदलावेत. अनेकदा लक्षात ठेवणे सोपे पडते म्हणून एकापेक्षा जास्त अकाऊंटसाठी आपण एकच पासवर्ड ठेवतो. हे चुकीचे आहे.

५) आपली गोपनीय माहिती उदा. पॅन, आधार, कार्ड नंबर, सीव्हीव्ही (CVV) मागणाऱ्या ई- मेल्सना उत्तर देऊ नये. कोणत्याही ई -मेलमध्ये अशा लिंक असल्यास त्या उघडू नयेत. बँक कधीही अशी माहिती ई -मेलवर मागवत नाही.

एटीएम केंद्रामध्ये घ्यावयाची काळजी

  • - एटीएम व्यवहार करताना अन्य त्रयस्थ व्यक्तींना प्रतिबंध असून, यात बँक कर्मचारी व सुरक्षारक्षक यांचाही समावेश होतो. पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये.

  • - आपल्या क्रेडिट/ डेबिट कार्ड पिन लक्षात ठेवावा. तो कार्ड अथवा कव्हरवर लिहून ठेवू नये.

  • -एटीएम (ATM) मशिनच्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू दिसल्यास व्यवहार करू नये. अनेकदा कार्ड ठेवण्याच्या खाचेवर पिन नंबर रेकॉर्ड करण्यायोग्य छोटी उपकरणे बसवलेली असू शकतात.

  • -अपुरे रद्द झालेले व्यवहार निदर्शनास आल्यास आपल्या बँकेच्या ताबडतोब लक्षात आणून द्यावेत. कोणत्याही ‘एटीएम’मधून पैसे न मिळाल्यास ते एटीएम कोणत्या बँकेचे आहे, हे विचारात न घेता आपल्या बँकेकडे लेखी अथवा ई -मेलवर तक्रार करावी. लेखी तक्रारीची पोहोच घ्यावी ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केल्यास तक्रार क्रमांक घ्यावा. हे पैसे ५ कामकाजाच्या दिवसात ग्राहकास परत मिळायला हवेत. रद्द झालेल्या आयएमपीएस आणि यूपीआय व्यवहाराचे पैसे २४ तासांत परत मिळाले पाहिजेत. यानंतर होणाऱ्या दिरंगाईसाठी रु. १०० प्रति दिवस एवढी नुकसान भरपाई द्यावी लागेल. हेच नियम ऑनलाइन व्यवहारांनाही लागू आहेत.

  • -विविध कारणे सांगून उदा. कार्ड बंद होणार आहे, आयकर परतावा मिळणार आहे, बक्षीस लागले आहे, कार्ड लिमिट वाढवायचे आहे अशी किंवा अन्य कोणतीही कारणे सांगून फोनवर कार्ड तपशील, ओटीपी मागितला जाऊ शकतो. तो अजिबात देऊ नये. अशी माहिती बॅंक फोनवरून ग्राहकास कधीही विचारत नाही.

  • -क्रेडिट कार्ड मर्यादेत वापरावे. नियमित कालावधीपूर्वी पूर्ण बिल भरावे, अन्यथा भरमसाट व्याजदराने रक्कम चुकवावी लागते (३६ ते ४२ %).

  • -कोणत्याही दुकानामध्ये कार्ड स्वॅप केल्यानंतर पिन स्वतः टाकावा. आपला कार्ड तपशील कोणी लिहून घेत नाही, फोटो काढत नाही, यावर लक्ष ठेवावे.

  • -कार्ड स्टेटमेंट तपासून सर्व व्यवहार आपणच केले असल्याची खात्री

  • करणे गरजेचे आहे.

  • -प्रत्येक व्यवहाराचा संदेश मोबाइलवर येत असल्याची खात्री करावी. संपर्क क्रमांक बदलल्यास त्याची नोंद बँकेत लगेच करावी.

  • -कार्ड हरवल्यास ती वापरण्यास ताबडतोब वापरण्यास प्रतिबंधित (block) करणे आवश्यक आहे.

  • -कार्ड वापरायचे नसल्यास बँकेस परत देऊन त्याची पोहोच घ्यावी. फेकून देणार असल्यास त्यावरील मॅग्नेटिक स्ट्रीपचे बारीक तुकडे करावेत.

  • -कोणत्याही बॅंकिंग सेवेसंबधी तक्रार उद्‌भवल्यास, तिचे निवारण करणारी व्यवस्था माहीत करून घ्यावी. यासंबंधीची लेखी तक्रार शाखापातळीवर देऊन, त्याचा पाठपुरावा करावा. एक महिन्यात त्यांनी काही निर्णय न दिल्यास किंवा त्यांचा निर्णय मान्य नसेल तर बँकिंग लोकपाल, रिझर्व्ह बँक यांच्याकडे तक्रार करता येते. या सर्व तक्रारी ऑनलाइन माध्यमातूनही करता येतात. त्याचा चिकाटीने पाठपुरावा करावा.

धनादेश वापरताना

  • धनादेश देणाऱ्याने त्यावरील रक्कम अंकात व अक्षरात स्वहस्ते लिहिणे गरजेचे असून, सही केलेले कोरे चेक कोणालाही देऊ नयेत.

  • ड्रॉपबॉक्स सोय असलेल्या ठिकाणी ग्राहकाची मागणी असल्यास काउंटरवर चेक स्वीकारून पावती मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे.

  • पुढील तारखेचे धनादेश दिले असल्यास, खात्यात त्या दिवशी पुरेशी शिल्लक असणे आवश्यक असते. चेक न वटता परत गेल्यास दंड आकारला जातो.

  • पैसे ऑनलाइन पाठवताना चुकीच्या खात्यात गेले तर...

  • सध्या पैसे दुसऱ्याला पाठवण्याचे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. उदा. नेट बँकिंग, यूपीआय, मोबाईल वॉलेट इ. मुळे २४ तास कधीही व्यवहार करता येतात. ही सोपी आणि तितकीच जोखमीची व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवावे.

ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करताना, तुमच्याकडून चुकून भलत्याच खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले तर ही बाब लक्षात येताच तातडीने याबाबतची माहिती आपल्या बँकेत द्यावी. बँकेच्या कस्टमर केअरला (Customer Care) फोन करून घडलेला प्रकार सांगावा. बॅंकेने तुमच्याकडे ई-मेलवरून या प्रकाराची माहिती मागवली तर ट्रान्झॅक्शनबाबत सर्व माहिती ई-मेलमध्ये द्यावी. त्यात ट्रान्झॅक्शनची तारीख, वेळ, तुमचा अकाउंट नंबर, ज्या खात्यावर चुकून रक्कम ट्रान्स्फर झाली त्याची माहिती द्यावी. चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले असतील तर रक्कम परत मिळण्यास काही दिवस लागू शकतात. तसेच या प्रकाराबाबत बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकास (Branch Manager) माहिती द्यावी. कारण, तुमची बॅंक तुमच्या माहितीच्या आधारे संबंधित शाखेशी संपर्क साधते. ज्या खात्यावर चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्या व्यक्तीला कळवून, ती रक्कम परत देण्याची विनंती करेल. त्याने नकार दिल्यास त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करता येतो.

मात्र रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लाभार्थ्याच्या खात्याबद्दल योग्य माहिती देणं ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी असते. कोणत्याही कारणास्तव लिंक करणाऱ्याने चूक केली असेल तर त्याला बॅंक जबाबदार राहत नाही. त्यामुळे खाते क्रमांक योग्य टाकणं ही संबंधित ग्राहकाची जबाबदारी असते. हे लक्षात ठेवून लाभार्थ्यांचा खाते क्रमांक व अन्य माहिती खूप काळजीपूर्वकच भरणे गरजेचे असते.

जेव्हा बॅंक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करता तेव्हा तुम्हाला एक मेसेज (Message) येतो. ‘जर हा व्यवहार चुकीचा असेल, तर कृपया हा मेसेज ‘या’ नंबरवर पाठवा,’ असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. चुकून भलत्याच खात्यात पैसे जमा झाले तर संबंधित बॅंकेनं यावर तातडीनं कार्यवाही करावी, अशा सूचना ‘आरबीआय’नं (RBI) बॅंकांना दिलेल्या आहेत. तुमचे पैसे चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात जमा करण्याची जबाबदारी बॅंकेची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT