Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : पावसाच्या अंदाजाचा कापूस बाजारावर परिणाम दिसू शकतो का?

Anil Jadhao 

Cotton Arrival : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. आज कापूस बाजारात काहीशी संमिश्र स्थिती दिसली. काही बाजारांमध्ये दरात किंचित सुधारणाही पाहायला मिळाली. पण सरासरी दरपातळी दबावातच होती.

त्यातच हवामान विभागाने यंदा काही भागात कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे कापूस लागवड किती होते आणि वेळेवर होते का? याचाही परिणाम बाजारावर दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कापूस बाजारात संमिश्र चित्र दिसलं. काही बाजारात कापसाच्या दरातील नरमाई कायम होती. तर काही बाजारांमध्ये दर स्थिर दिसले. काही ठिकाणी दरात किंचित सुधारणा झाली होती. पण एकूण सरासरी दरपातळी आजही कायम दिसली.

कापसाला आजही सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाचा भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. कापसाचे भाव दबावात आल्याने शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसत आहे.

आवकेचा विचार करता आजही देशातील बाजारात दबाव होता. देशात आज एक लाख गाठीच्या दरम्यान आवक झाली होती. गुजरात आणि महाराष्ट्रातील आवक जास्त आहे. दोन्ही राज्यांमध्येच जवळपास ८० हजार गाठींची आवक होत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यंदा कापूस मोठ्या प्रमाणात मागे ठेवला होता.

पण हे शेतकरी आता कापूस विकत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. फेब्रुवारीपर्यंत देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत होता. पण सध्याचा दर पाहता शेतकऱ्यांना सरासरी दीड हजार रुपयांचा फटका बसत आहे.

खरिपाच्या लागवडीसाठी विक्री सुरु आहे. ही विक्री पुढील काही दिवसांमध्ये कमी होऊ शकते. कारण आर्थिक नड असलेले शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विकत आहेत. पण खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर शेतकरी या भावात कापूस विकणार नाहीत.

तसेच जे शेतकरी जास्त काळ थांबू शकतात, त्यांचाही कापूस लगेच बाजारात येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जून महिन्यातही संपूर्ण कापूस बाजारात येण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत.

हवामान विभागाने काल देशातील माॅन्सून काळात किती पाऊस पडेल याचा अंदाज व्यक्त केला. त्यातच महत्वाच्या कापूस उत्पादक भागांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरातमध्ये कापूस लागवड जास्त असणाऱ्या काही भागातही सारसरीपेक्षा पावसाचे प्रमाणा कमी राहू शकते, असा अंदाज आहे.

तसेच कापूस लागवडीसाठी महत्वाचा असलेल्या जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे खरिपात कापूस लागवड किती होते आणि केव्हा होते, हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच यामुळे बाजारात चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT