Agriculture Export
Agriculture Export 
ॲग्रोमनी

अपेडाची शेतमाल निर्यात २३ टक्क्यांनी वाढून १९.७ अब्ज डॉलर्सवर

टीम ॲग्रोवन

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात भारतीय शेतमाल आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची अपेडाच्या (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) माध्यमातून झालेली निर्यात  २३.४ टक्क्यांनी वाढून १९.७ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

गेल्या वर्षी याच कालावधित १५.९७ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. शेतमालाच्या निर्यातीसाठी अपेडाकडून (APEDA) २७ प्रकारची वर्गवारी केली जाते.  २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात देशाच्या एकूण कृषी निर्यातीपैकी (Agriculture Product Export) निम्मी निर्यात ही अपेडाच्या माध्यमातून (४१.२५ अब्ज डॉलर्सची निर्यात) झाली आहे. यातील सागरी उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण १४ टक्के तर मसाला उत्पादन निर्यातीचे प्रमाण १० टक्के आहे.

२०१८ सालच्या निर्यात धोरणानुसार २०२२-२०२३ सालापर्यंत भारताची कृषी निर्यात दुपटीने वाढवून ६० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २०२१-२२ या वर्षात अपेडासमोर २३.७१ अब्ज डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे.

अपेडाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील ११ महिन्यांत भारतातून ७.७ अब्ज डॉलर्स मूल्याचा तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यात आला आहे. भारताच्या गव्हाची निर्यात (Wheat Export)१.७४ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. मक्यासह इतर तृणधान्यांची निर्यात (Cearels Export) ८६९ लाख डॉलर्सवर गेली आहे. पोल्ट्री उत्पादन, मांस आणि डेअरी उत्पादनांच्या (Dairy Product) निर्यातीत वाढ झाली आहे. या मालांची निर्यात १३ टक्क्यांनी वाढून ३.४० अब्ज डॉलर्सवॉर गेली आहे. तसेच ताजी फळे आणि भाज्यांची निर्यात ११ टक्क्यांनी वाढली असून १.२७ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT