संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
ॲग्रोमनी

सोयाबीन उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार

कोजेन्सिस वृत्तसेवा
नवी दिल्ली ः पीकक्षेत्रात घट झाल्याने यंदा (२०१७-१८) सोयाबीनचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. गेल्या वर्षी ११.४९ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. यंदा ते ९.१५ दशलक्ष टनांपर्यंत खाली येईल, असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोशिएशनने (सोपा) व्यक्त केला अाहे.
 
मध्य प्रदेश अाणि महाराष्ट्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांतील पीकक्षेत्रात घट झाली अाहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत अाहेत. राजस्थान, अांध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, छत्तीसगड अाणि गुजरात अादी राज्यांमध्येही सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते.
 
सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाचे पीक असून, एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा ४० टक्के अाहे. मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादन यंदा प्रतिहेक्टरी ९०५ किलोपर्यंत खाली येण्याची शक्यता अाहे.
 
गेल्या वर्षी सोयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता १,०५८ किलो एवढी होती. तर महाराष्ट्रातील उत्पादन प्रतिहेक्टरी १,१०२ किलोवरून ९२५ किलोपर्यंत घटण्याचा अंदाज अाहे. कापूस पिकाला किफायतशीर दर मिळत असल्याने यंदा शेतकरी सोयाबीन पिकाकडून कापूस पिकाकडे वळले असल्याचे चित्र दिसत अाहे.
 
यंदा देशात सप्टेंबरअखेरपर्यंत १०५ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली अाहे. गेल्या वर्षी ११४ लाख हेक्टरवर पीकक्षेत्र होते, अशी माहिती ‘सोपा’ने दिली अाहे. 
 
एकूण तेलबिया उत्पादनातही घट
मध्य प्रदेशात यंदा तेलबिया उत्पादन ४.५४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी ५.७२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर महाराष्ट्रात उत्पादन ३.१९ दशलक्ष टन होईल. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादन ३.९५ दशलक्ष टन झाले होते. यंदा त्यात घट होणार अाहे, असा अंदाज ‘सोपा’ने व्यक्त केला अाहे.
 
सोयाबीन पीकक्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)
 
२०१७-१८ १०५.९२
२०१६-१७ ११४.७९
 
उत्पादन अंदाज (दशलक्ष टनांमध्ये)
 
२०१७-१८ ९.१५
२०१६-१७ ११.४९

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT