कापूस खरेदी
कापूस खरेदी 
ॲग्रोमनी

खानदेशातून दररोज ‘गुजरात’ची कापूसखरेदी

Chandrakant Jadhav

जळगाव ः खानदेशातील जिनिंग सुरू होताच गुजरातमधील मोठे व्यापारी आणि जिनिंग व्यावसायिकांनी येथून कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक जिनर्सना जिनिंग पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्‍य झाले आहे. खानदेशातून गुजरातेत रोज पाच ते साडेपाच हजार क्विंटल कापूस जात असून, त्याचे मिश्रण गुजरातच्या शंकर-६ या ब्रॅण्डच्या कापूस गाठींमध्ये होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  गुजरात व खानदेशचा सीमाभाग जवळ आहे. यातच खानदेशात पूर्वहंगामी कापूस अगदी दसरा सणापूर्वीच घरात यायला लागतो. त्यामुळे गुजरातमधील जिनर्स, मोठे व्यापारी येथून कापूस खरेदी करतात. तुलनेत खानदेशी कापूस एक ते दीड हजार रुपये क्विंटलमागे कमी दरात तेथील व्यापाऱ्यांना मिळत आहे. अर्थातच गुजरातेत २६ लाख हेक्‍टर कापसाखालील क्षेत्रात अधिकाधिक क्षेत्र देशी कापूस वाणांनी व्यापले असून, त्याचे दर बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणाच्या कापसाच्या तुलनेत अधिक आहेत. दुसऱ्या बाजूला खानदेशात बीटी कापूस अधिक असून, तो गुजराती कापूस आयातदारांना सध्या परवडत आहे. तेथील व्यापारी किंवा जिनर्स खानदेशातील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापूस मागवत आहेत. ट्रकद्वारे चोपडा- शिरपूर- शहादा- अक्कलकुवामार्गे अंकलेश्‍वर (गुजरात)मध्ये कापूस दाखल होत आहे. तर धुळे, नंदुरबार भागातील कापूस निझर (गुजरात) मार्गे बारडोली, सुरतपर्यंत जात आहे. चोपडा, शिरपूर, तळोदा, शहादा, जळगाव, धरणगाव, अमळनेर भागातून गुजरातेत रोज कापूस जात आहे. याच वेळी खानदेशात जिनिंगमध्ये गाठींचे उत्पादन सुरू झाले असून, काही जिनिंगचा अपवाद वगळता इतर जिनिंगना पुरेसा कापूस सध्या मिळत नाही.  शंकर-६ मध्ये मिश्रण  खानदेशमधून आयात केला जाणारा कापूस व इतर बाबींमुळे गुजरातमधील कापूस गाठींचे उत्पादन अधिक आहे. खानदेशातील कापसाचे मिश्रण गुजराथी कापूस गाठींचा ब्रॅण्ड असलेल्या शंकर - ६ मध्ये केले जाते. या गाठींमध्ये अधिकाधिक देशी कापसाची रुई असते, तर काही प्रमाणात बीटी कापूस असतो. खेडा खरेदी तेजीत गुजराथी कापूस आयातदारांच्या मध्यस्थांकडून दिवाळी सणाच्या काळातही खेडा खरेदी जोरात सुरू होती. गुजरातपासून जवळ असलेल्या खानदेशच्या भागात दर ४५०० ते ४६०० पर्यंत होते. तर जळगाव, धरणगावात ४४०० ते ४४५० रुपये प्रतिक्विंटल, असे दर दिले जात असल्याची माहिती मिळाली.  प्रतिक्रिया गुजरातमध्ये विक्रीकर, वस्तू व सेवाकर बुडवून रोज पाच ते सहा हजार क्विंटल कापूस जातो. याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यायला हवे. खानदेशातील जिनर्सना त्याचा फटका बसत असून, निम्म्या क्षमतेनेच जिनिंग सुरू आहेत.  - लक्ष्मण पाटील, सदस्य, खानदेश जिन प्रेस कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT