urea
urea 
ॲग्रोमनी

एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१ टक्के वाढ 

वृत्तसेवा

नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन केले असतानाही या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या नॅशनल फर्टीलाझर्स लि. (एनएफएल) च्या खत विक्रीत एप्रिल महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये ३.६२ लाख टन खत विक्री झाली असून गेल्या वर्षी याच काळात २.१२ लाख टन विक्री झाली होती.  देशात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे खत कंपन्यांना खते वाहतूक आणि लॉजिस्टीकची मोठी समस्या जाणवत आहे. या समस्या असतानाही संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कंपनीने खते वेळेवर पोचविली आहेत. ‘एनएफएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा म्हणाले की, ‘‘एप्रिल-२०२० मध्ये आतापर्यंतचा खते विक्रीचा विक्रम झाला आहे. कंपनीच्या मार्केटींग टिमने लॉकडाऊनच्या काळात अथक परिश्रम घेऊन खते वितरण केले आहे.’’  ‘एनएफएल’ पंजाबमधील नांगल आणि भटींडा, हरियानातील पानीपत आणि मध्य प्रदेशीतल वियजपूर येथील दोन अशा पाच प्लांटमध्ये युरिया उत्पादन करते. कंपनीची ३५.६८ लाख टन युरिया उत्पादनाची क्षमता आहे.  एप्रिल महिन्यात वर्षनिहाय झालेली खत विक्री (लाख टनांत)  १.५६  २०१७ 

१.६७  २०१८ 

२.१२  २०१९ 

३.६२  २०२० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT