शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस पडून
शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस पडून 
ॲग्रोमनी

राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस पडून

Vinod Ingole

नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ७८ ते ८० लाख क्विंटल कापसाचा घरात साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. येत्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशांची सोय कशी करावी, तसेच कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.  सीसीआय तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून यंदा ५५५० रुपये क्विंटल या हमीभावाने कापूस खरेदी झाली. खुल्या बाजारात मात्र ४७०० ते ४९०० रुपये क्विंटल दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’कडे कापूस विक्री करण्यावर भर दिला. यावर्षी पणन महासंघाने विक्रमी ५२ लाख क्‍विंटल तर सीसीआयने ७२ लाख क्‍विंटल कापूस खरेदी केला. मात्र, सुमारे ७८ ते ८० लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे.  त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यापुढील काळात मागणी वाढून हमीभावापेक्षा दर वधारतील, अपेक्षा कापूस उत्पादकांना होती. मात्र ‘कोरोना’मुळे कापूस बाजार ठप्प झाल्याने त्यांची स्थिती अडकित्त्यात सापडल्यागत झाली आहे.  शासनाने खरेदीचा विचार करावा शिरुळ (ता.हिंगणा जि. नागपूर) हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. बहुतांश क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. दरवाढीच्या शक्‍यतेने कापूस साठवून ठेवला. आता मात्र आमच्यावर रडण्याची वेळ आली आहे, अशी माहिती शेतकरी विनोद येळणे यांनी दिली. कापूस वेचणीसाठी १५० रुपये मण (२० किलो) प्रमाणे मजुरी होती. येत्या हंगामाकरिता पैसे कसे उभारावे ही अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. पैसे मिळण्याबाबत भरवसा नसल्याने मशागतीकरिता ट्रॅक्‍टरचालकही येण्यास तयार नाहीत, असे विनोद येळणे यांनी सांगितले.  राज्यात पणन महासंघाने ५२ लाख क्‍विंटल तर सीसीआयने ७२ लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केला आहे. दरवाढीच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवला. राज्यात सुमारे ८० लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. ‘कोरोना’मुळे खरेदी बंद असली तरी शासनाने हा कापूस खरेदी करण्याचे निदान आश्‍वासन दिले तरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अन्यथा व्यापारी मनमानी दराने त्याची खरेदी करतील. - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT