Sugar Market Agrowon
ॲग्रोमनी

Sugar Market : मे महिन्यात कारखान्यांना २४ लाख टन साखर विक्रीचा कोटा

केंद्र सरकारने मे महिन्यासाठी २४ लाख टनांचा साखर विक्रीचा कोटा जाहीर केला. एप्रिल महिन्यातही सरकारने कारखान्यांसाठी एवढाच कोटा दिला होता.

Team Agrowon

Sugar Rate Update : केंद्र सरकारने मे महिन्यासाठी २४ लाख टनांचा साखर विक्रीचा कोटा जाहीर केला. एप्रिल महिन्यातही सरकारने कारखान्यांसाठी एवढाच कोटा दिला होता. सध्या देशात साखरेचे दर (Sugar Rate) तेजीत आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने साखर विक्रीचा कोटा कायम ठेवला.

केंद्राने देशातील ४८५ साखर कारखान्यांना हा कोटा जाहीर केला. मे महिन्याच्या कोट्यात केंद्राने छत्तीसगड राज्याचा कोटा ९५ टक्क्यांनी वाढवला. पण उत्तर प्रदेशातील कारखान्यांसाठी ८ लाख ५७ हजार टनांचा कोटा मिळाला. तर महाराष्ट्रातील कारखाने ७ लाख ३८ हजार टन साखर विकू शकतात. कर्नाटकातील कारखान्यांना मे महिन्यासाठी ३ लाख ६९ हजार टनांची साखर किक्री कोटा मिळाला.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन इर्थात इस्माने यंदा देशातील साखर उत्पादनाचा अंदाज कमी केला. यापुर्वी इस्माने देशात ३४० लाख टन साखर निर्मिती होईल, असा अंदाज जाहीर केला होता.

तर आता सुधारित अंदाज ३२८ लाख टनांपर्यंत कमी केला. यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये उत्पादन कमी झाले. मागील हंगामात देशात ३५७ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

भारतात दरवर्षी २७५ लाख टन साखर वापर होतो. १५ एप्रिलपर्यंत देशातील साखर उत्पादन ५.४ टक्क्यांनी कमी झाले. यंदा १५ एप्रिलपर्यंत ३११ लाख टन साखर मिळाली. तर गेल्या हंगामात याच काळातील साखर उत्पादन ३२८ लाख टनांवर होते.

महाराष्ट्रात यंदा १०५ लाख टन साखर उत्पादन झाले. तर कर्नाटकात ५५ लाख टन उत्पादन झाले. उत्तर प्रदेशातही आतापर्यंत १०५ लाख टन साखर उत्पादन मिळाल्याचे इस्माने म्हटले आहे.

केंद्र सरकारने देशात इथेनाॅल उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन दिले आहे. केंद्राने थेट साखरेपासूनही इथेनाॅल निर्मितीला परवानगी दिली आहे. जानेवारीत ४५ लाख टन साखर थेट इथेनाॅल निर्मितीसाठी देण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. पण त्यात आता कपात करून ४० लाख टन करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT