Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाच्या खरेदीवरील ‘आरसीएम’ कर रद्द करा

Cotton Market Update : महाराष्ट्र कापूस असोसिएशनमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातील कापसाचे व्यापार करणारे जिनिंग व्यवसाय करणारे समाविष्ट आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : कापसाच्या खरेदीवर लावला जाणारा आरसीएम कर रद्द करा, बाजार समितीच्या करात एक समानता आणा, कापूस गाठी निर्यात करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात जिनिंगचा वाटा ठेवा, नवीन युनिट प्रमाणेच जुन्या युनिटलाही सोलर प्लांटसाठी सबसिडी द्या, आदी मागण्या महाराष्ट्र कापूस असोसिएशनने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर ठेवल्या.

महाराष्ट्र कापूस असोसिएशनमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातील कापसाचे व्यापार करणारे जिनिंग व्यवसाय करणारे समाविष्ट आहेत. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची मंगळवारी (ता. २०) भेट घेतली.

कापसाच्या खरेद- विक्री संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी यासह केंद्र आणि राज्य सरकारची कापूस विषयी असलेली धोरणात सुधारणा, जिनिंग मिल्स यांना आवश्यक असलेली करांमध्ये सवलत, कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाच्या खरेदी- विक्री व्यवहारावर लावत असलेला कर,

जिनिंग मिलची विजेची सबसिडी, यासह जिनिंग मिल येथे बसवण्यात आलेले सोलार प्लांट तसेच विविध योजनेचे अनुदान मिळण्याबाबत मागण्यांचे निवेदन देत याविषयी सविस्तर मांडणी कापूस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्यासमोर केली.

या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी विजय अग्रवाल, विजय बियाणी, रसदीप सिंग चावला, ओम प्रकाश डागा, निखिल अग्रवाल, यश अग्रवाल, प्रल्हाद तायल, रामेश्‍वर राठी आणि अजय सोमानी यांच्यासह कॉटन असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT