Moong Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Moong Market : मुगाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये दर

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : शिरूर येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात शनिवार (ता.१७) पासून मुगाची आवक सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी ११ क्विंटल मुगाची आवक झाली. चांगल्या दर्जाच्या मुगाला सुमारे ६ हजार ५०० रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला असल्याची माहिती सचिव अनिल ढोकले यांनी दिली.

यंदा वेळेवर पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी जूनमध्ये मुगाच्या पेरणीस सुरुवात केली होती. तालुक्यात मुगाचे सरासरी १२ हजार ६९० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ११ हजार ५ हेक्टर म्हणजेच ८७ टक्के पेरणी झाली. त्यानंतर झालेल्या अधूनमधून पावसामुळे तालुक्यात मुगाचे चांगले पीक आले होते. सध्या लवकर पेरणी केलेल्या मुगाची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मूग काढणीच्या कामांत गुंतले असले तरी ज्या शेतकऱ्यांनी काढणी केली आहे, असे शेतकरी आर्थिक अडचणीमुळे बाजारात विक्रीसाठी मूग आणत आहे.

सध्या हंगामातील ही पहिल्यांदाच आवक सुरू झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने व वाळवण चांगली होत असल्याने सुमारे अकरा क्विंटल मुगाची आवक झाली. चांगल्या दर्जाच्या मुगाला ८ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी येथील उपबाजारात आठवड्यातील सातही दिवस मुगाचा बाजार सुरू करण्यात आला. दरम्यान, येथील उपबाजारात मुगाच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी बाजार समितीने विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या असून, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

येथील उपबाजारात शिरूरसह श्रीगोंदा, पारनेर, दौंड, हवेली, खेड आदी तालुक्यांतून शेतकरी मूग विक्रीसाठी आणतात. शेतकऱ्यांनी येथील बाजारात वाळवून चांगल्या दर्जाचा मूग आणतात. सध्या शिरूर तालुक्यातील करडे, कान्हूर मेसाई, आंबळे, बांबरडे, कवठे यमाई, मलठण, धामारी, पाबळ या भागांतून मुगाची आवक सुरू झाली आहे.

चालू वर्षी ४५ गुंठे क्षेत्रावर मूग पिकांची पेरणी केली होती. त्यानंतर शेंगा चांगल्या लागल्या होत्या, संख्याही जास्त होती. परंतु सततच्या पावसामुळे मुगाच्या दाण्यांचा आकारात वाढ झाली नाही. त्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट येत आहे. काढणीच्या वेळेस अर्ध्या क्षेत्राची यंत्राच्या साहाय्याने काढणी केली. बाजारात यंत्राच्या साहाय्याने काढलेल्या मुगाची चमक कमी असल्यामुळे प्रति क्विंटलला ६ हजार ७०० रुपये कमी मिळाला. तर काही क्षेत्राची हाताने काढणी केली होती, त्या मुगाला प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपये दर मिळाला.
- राजेंद्र गायकवाड, मूग उत्पादक शेतकरी, करडे, शिरूर
यंदा जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुगाची पेरणी झाली आहे. आता मुगाच्या काढणीस सुरुवात झाल्याने काही शेतकरी बाजार समितीत मूग विक्रीसाठी आणत आहेत. शनिवारी (ता.१७) पहिल्याच दिवशी ११ क्विंटलची आवक झाली असून येत्या काळात आणखी आवक वाढणार आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
- अनिल ढोकले, सचिव, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT