Turmeric Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Sales: देशात ८० टक्के हळदीची विक्री

India Spice Market: देशात यंदाच्या वर्षात सुमारे ७५ लाख पोती (एक पोते ५० किलोचे) हळद उत्पादन झाले असून, त्यापैकी ८० टक्के म्हणजे ६० लाख पोत्यांची विक्री झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: देशात यंदाच्या वर्षात सुमारे ७५ लाख पोती (एक पोते ५० किलोचे) हळद उत्पादन झाले असून, त्यापैकी ८० टक्के म्हणजे ६० लाख पोत्यांची विक्री झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात प्रति क्विंटल दीड हजार रुपयांनी दर दबावात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद विक्री थांबवली असून, १५ लाख पोती शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक असल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात गत वर्षी हळद लागवडीचा घटीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे हळदीचे उत्पादन कमी होईल असे या उद्योगातील काही जाणकांनी म्हटले होते. मात्र तेलंगण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत हळदीचे क्षेत्र वाढले, तर महाराष्ट्रात हळदीच्या क्षेत्रात मोठी घट झाली. इतर राज्यात कमी-अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड झाली. त्यामुळे काही ठिकाणी हळदीचे उत्पादन कमी तर काही ठिकाणी उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे हळद उद्योगातील हळद उत्पादनाचे अंदाज फोल ठरल्याचे चित्र आहे.

देशात हळदीचे ७५ लाख पोत्यांचे उत्पादन झाले असल्याचे हळद व्यापाऱ्यांनी सांगितले. गत वर्षी हळद विक्रीच्या प्रारंभापासून हळदीचे दर तेजीत राहिले. या दरम्यान, हळदीला मागणीही असल्याने उठावही लवकर झाला. त्यामुळे बाजारपेठेत हळदीची विक्री झपाट्याने झाली. तमिळनाडूतील इरोडमध्ये वर्षभर हळदीची विक्री सुरू राहते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने विक्री सुरू ठेवली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात प्रति क्विंटलला १००० ते १५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यातच हळदीची मागणीही कमी झाली असल्याने उठावही कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी हळद विक्रीसाठी थांबले आहेत. त्यामुळे बाजारात हळदीची आवक काहीशी मंदावली आहे. मराठवाडा, तेलंगण यांसह अन्य भागांत हळदीची आवक सुरू आहे. परंतु दर घटल्याने हळदीच्या दरात वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकरी करू लागला आहे.

मसाला उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी हळद खरेदी केली आहे. त्यामुळे या कंपन्या बाजारात हळद खरेदीसाठी येत नाहीत. सध्या हळदीच्या दर्जानुसार प्रति क्विंटल १२ हजार ते १३,५०० रुपये असा दर मिळत आहे.

देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. निर्यातक्षम हळदीला १५ हजार रुपये प्रति क्विटंल असा दर होता. मात्र निर्यातीचे दरही घटले आहे. सध्या निर्यातक्षम हळदीला १३,५०० रुपये असा दर मिळत असून उठावही कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाचा फटका हळद व्यापारावर परिणाम झाला आहे. बांगलादेशातही हळदीची मागणी कमी झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा क्षेत्र वाढीची शक्यता

यंदाच्या हंगामातील हळद लागवड सुरू झाली आहे. या हंगामात हळद लागवडीचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जात आहे. त्यामुळे देशातील हळदीचे क्षेत्र वाढेल, अशी शक्यता उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशात पाऊसही चांगला असल्याने पीकही चांगले येईल, त्यामुळे पुढील वर्षी हळदीचे उत्पादनही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु देशातील हळद लागवडीचे चित्र ऑगस्ट महिन्यात स्पष्ट होईल.

देशात हळदीची मागणी कमी झाली असल्याने उठावही नाही. त्यामुळे हळदीचे दर कमी झाले आहेत. एकंदर सप्टेंबरपर्यंत हळदीच्या दरात तेजी-मंदी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरही दरात फारशी वाढ होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नसल्याचे चित्र आहे.
मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली
मराठवड्यातील हळदीची विक्री उशिरा सुरू होते. त्यामुळे इथल्या बाजारात हळदची आवक सुरू असून, इतर भागात अत्यल्प हळदीची आवक सुरू आहे. देशातील सुमारे ८० टक्के हळदीची विक्री पूर्ण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर स्थिर आहेत.
गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT