Kharif Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : खरीप कांद्याला मुहूर्ताचा प्रतिक्विंटल ७१०० रुपये दर

मुकूंद पिंगळे

Nashik News : खरीप लाल कांदा लागवडी यंदा पावसामुळे प्रभावित झाल्या. परिणामी, दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. खारीफाटा (उमराणे) येथील श्री रामेश्‍वर कृषी मार्केटमध्ये दसऱ्याच्या मुहूर्ताला जिल्ह्यात उच्चांकी प्रतिक्विंटल ७१०० रुपये उच्चांकी दर मिळाला.

सुरुवातीच्या टप्प्यात कांदा लागवडी पावसामुळे अडचणीत सापडल्या. तर काही ठिकाणी कांदा काढण्यासाठी असताना जोरदार पावसामुळे कांदा लागवडीचे नुकसान आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा बाजारात आला. देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील श्री रामेश्‍वर कृषी मार्केटमध्ये १० बैलगाडी, ५६ पिकअप व ४८ ट्रॅक्टर अशा अशी एकूण ११४ वाहनांतून एकूण अंदाजे १३०० क्विंटल आवक झाली.

प्रकाश कांतीलाल ओस्तवाल यांच्या हस्ते लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. राज ट्रेडर्स यांनी लिलावाच्या मुहूर्ताला उच्चांकी प्रतिक्विंटल ७१०० दराने बोली लावून शेतकरी किसन झिपा राठोड (रा. उमराणे) यांचा नवीन लाल कांदा खरेदी केला.कांद्याला प्रतिक्विंटल किमान ५०० कमाल ७१००, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाला.

लिलावाप्रसंगी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, बाजार समितीचे माजी सभापती राजू देवरे, श्री रामेश्‍वर कृषी मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, पुंडलिक देवरे आदींसह कांदा व्यापारी, बाजार समिती सचिव, उपसचिव, सर्व कर्मचारी, कामगार आदी उपस्थित होते.

उमराणे येथील स्वर्गीय निवृत्ती काका देवरे बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची सर्वाधिक २१०० क्विंटल आवक झाली. तर सर्वांत कमी आवक लासलगाव बाजार समितीत झाल्याचे दिसून आले. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात उपसभापती विनोद चव्हाण यांच्या हस्ते लिलाव सुरू झाले. मुंगसे येथील शेतकरी गोकुळ सूर्यवंशी यांनी मुहूर्तावेळी बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ६१११ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. जयेश ट्रेडिंग कंपनीचे अडतचे जयेश शहा यांनी बोली लावून हा कांदा खरेदी केला. येथे १२० वाहनांतून आवक झाली होती.

पावसामुळे कांद्याचे नुकसान; तेजीची शक्यता

जिल्ह्यात यंदा उशिराने पाऊस झाल्यानंतर खरीप कांदा लागवडी वाढल्या. प्रामुख्याने मालेगाव, चांदवड, देवळा, नांदगाव, येवला तालुक्यांत आगाप खरीप लागवडी असतात. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात कमी पर्जन्यमान व काढणी काळात झालेला मुसळधार पावसामुळे कांदा लागवडीचे नुकसान आहे. त्यामुळे आगामी टप्प्यात कांद्याची आवक घटण्याची शक्यता आहे. एकीकडे उन्हाळा कांदा संपुष्टात आला असून, नवीन कांद्याचे नुकसान झाल्याने आवक कमी झाल्याचे दिसून आले. परिणामी, पुरवठा कमी होऊन दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

बाजार समित्यांमधील दरस्थिती (ता. १२) :

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी

श्री रामेश्‍वर मार्केट...१,३००...५००...७,१००...४,०००

मुंगसे...१८००...१,०५०...६,१६१...३,९९०

उमराणे...२,१००...१,८००...६,१६१...४,०००

लासलगाव...२२८...१,१००...३,६४१..३,१००

मनमाड...४००...१,१०१...५,१५१...३,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT