Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : परभणी, हिंगोलीत हरभऱ्याला ५१०० ते ६७०० रुपयांचा दर

माणिक रासवे

Pune News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील हरभऱ्याची उत्पादकता घटल्याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हरभऱ्याच्या आवकेवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हरभऱ्याची आवक कमी आहे. मागील आठवड्यात या दोन जिल्ह्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान ५१०० ते ६७०० रुपये दर मिळाला.

नोव्हेंबर २०२३ च्या अखेरीस या दोन जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसला. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. परंतु त्यानंतर हरभरा पिकांसाठी आवश्यक थंडी नव्हती. त्यामुळे उत्पादकता घटली. हरभऱ्याचे पीक मोडून इतर पिके घेतल्यामुळे क्षेत्र देखील कमी झाले. त्यामुळे हरभऱ्याची बाजारपेठेतील आवक कमी आहे.

परभणी बाजार समितीत मागील आठवड्यात दररोज हरभऱ्याची ५२ ते ६५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६००० ते ६४५० रुपये दर मिळाले. हिंगोली येथील भुसार माल मार्केटमध्ये आठवड्यातील एक दोन दिवसाआड हरभऱ्याची आवक होत आहे. शुक्रवारी (ता. ३१) हरभऱ्याची ४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६१६० ते कमाल ६५०० रुपये तर सरासरी ६३३० रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. २७) ३९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ६६९० रुपये तर सरासरी ६४९५ रुपये दर मिळाले. हिंगोली बाजार समितीअंतर्गत कन्हेरगाव नाका (ता. हिंगोली) येथील उपबाजारपेठेत शनिवारी (ता. १) १०९ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ६७०० रुपये तर सरासरी ६६०० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ३१) ५८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ६६००रुपये तर सरासरी ६४५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २७) ८१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ६६०० रुपये तर सरासरी ६३५० रुपये दर मिळाले. सेनगाव बाजार समितीत मागील आठवड्यात हरभऱ्याची प्रतिदिन ४२ ते ५४ क्विंटल आवक राहिली. प्रतिक्विंटल किमान ५१०० ते कमाल ६२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT