Ber Fruit  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ber Fruit Rate : संक्रांतीमुळे बोरांच्या दरात क्‍विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ

Fruit Market Update : मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढल्यामुळे गावरान बोरांच्या दरात क्‍विंटलमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : मकर संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढल्यामुळे गावरान बोरांच्या दरात क्‍विंटलमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. स्थानिक फळ आणि भाजीपाला बाजारात सद्यःस्थितीत बोरांची आवक कमी होत ती दहा क्‍विंटलपर्यंत खाली आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

दिवाळीपासून थंडीला सुरुवात झाल्यानंतर बोरांचा हंगामदेखील सुरू होतो. जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बोरांची आवक बाजारात होते, असे व्यापाऱ्यांन सांगितले. ग्रामीण भागात शेताच्या बांधावर काही प्रमाणात बोरांची झाडे आढळून येतात.

त्या खालील बोर वेचून त्यासोबतच झाडांची तोडत विक्रीसाठी बाजारात आणली जातात. सुरुवातीच्या काळात बोरांची आवक वाढती २५ त ३० क्‍विंटल होती. त्यात आता घट घोऊन ती १० क्‍विंटलवर आली आहे.

सुरुवातीच्या काळात बोरांना १२०० ते १५०० रुपयांचा दर होता. त्यानंतरच्या काळात दरात सुधारणा होत दर १२०० ते २००० रुपयांवर पोहोचले. आता मकर संक्रांतीमुळे बोरांना मागणी वाढल्याने दरात क्‍विंटलमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

सध्या १२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर गावरान बोराला मिळत असून आवक वाढण्याची मात्र कोणतीच शक्‍यता नसल्याचे सांगण्यात आले. मकर संक्रातीला दिल्या जाणाऱ्या वाणामध्ये विविध प्रकारच्या धान्याबरोबरच बोरांनादेखील मान आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बोरांच्या दरात सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण भागात उपलब्ध होतो रोजगार

झुडपांवरील बोर तोडत ती विक्रीसाठी आणली जातात. यातून गावखेड्यातील युवकांना रोजगार प्राप्त होत आहे. हिवाळ्याच्या दिवसात काही महिन्यांचा बोरांचा हंगाम राहतो. या कालावधीत चांगला पैसा यातून मिळत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Fake Fertilizer : कासेगावमध्ये ११ लाखांचा बनावट खतसाठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी सरकारला खेचणार न्यायालयात; निवडणुकीआधी पात्र, निवडणुकीनंतर अपात्र कसे?

Kharif Sowing : खानदेशात सहा टक्के क्षेत्र नापेर

SCROLL FOR NEXT