Soybean Market
Soybean Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : हिंगोलीत सोयाबीनला ४९०० ते ५१३३ रुपये दर

Team Agrowon

Soybean Market Update हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Hingoli APMC) धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) बुधवारी (ता. १५) सोयाबीनची ६४५ क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५१३३ रुपये तर सरासरी ५०१६ रुपये दर (Soybean Rate) मिळाले.

हिंगोली बाजार समितीतील भुसार मार्केटमध्ये गुरुवार (ता. ९) ते बुधवार (ता. १५) या कालावधीत सोयाबीनची ३०७० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ४७०० ते कमाल ५२१० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १४) ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४८०५ ते कमाल ५११२ रुपये तर सरासरी ४९५८ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १३) ३२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४७०० ते कमाल ५१०० रुपये तर सरासरी ४९०० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. ११) ७०० क्विंटल आवक होऊन सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१५१ रुपये तर सरासरी ४९७५ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. १०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५१९६ रुपये तर सरासरी ५०४८ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ९) ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२१० रुपये तर सरासरी ५००५ रुपये दर मिळाले.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

सोयाबीनच्या दरात शेतकऱ्यांना अपेक्षित सुधारणा नाही. दरात घसरण सुरूच आहे. त्यामुळे सोयाबीन साठवूण ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

Commodity Market : हळद, मुगाचे भाव वधारले

SCROLL FOR NEXT