Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : नव्या लाल कांद्याला ४ हजारांचा भाव

Onion Rate : सद्या चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजाराचा टप्पा पार केला आहे. मुळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने यापूर्वी चाळीतला कांदा विकला आहे.

Team Agrowon

Nashik News : कधी हसवणारा तर कधी रडवणारा कांदा या वर्षी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू खुलवत आहे. साठवलेला कांदा संपत आल्यावर उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजाराचा टप्पा पार केला आहे. सद्या या हंगामातील नवीन लाल कांदाही येथील बाजारात दाखल झाला असून प्रति क्विंटल चार हजाराचा भाव मिळाला.

अतिवृष्टीसह हवामानामुळे कांदा उत्पादक राज्यात प्रचंड नुकसान झाल्याने कांद्याची मागणी टिकून असून यामुळे भावही तेजीत राहिले आहे. सद्या चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजाराचा टप्पा पार केला आहे. मुळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने यापूर्वी चाळीतला कांदा विकला आहे.

मोजक्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असताना भावात मोठी तेजी आल्याचे शेतकरी सांगतात. त्याचा लाभ व्यापाऱ्यांसह मर्यादित शेतकऱ्यांनाच होत आहे. शेतकरी टप्प्याटप्प्याने उन्हाळ कांदा विक्रीला आणत असल्याने येथील बाजार समितीत रोज अडीच ते तीन हजार क्विंटलची आवक होताना दिसते.

जागतिक बाजारात कांद्याला मागणी असल्याने मागील आठवड्यापासून सहा हजारावर क्विंटलचा दर पोहोचला असून आज येथील बाजार समितीत उन्हाळ कांदा ६२५१ रुपये या सर्वोच्च दराने विक्री झाला तर सरासरी दर ५ हजार ६०० रुपये मिळाला. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची पाणी उपलब्धतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लवकर लागवड केली होती. किंबहुना काही शेतकऱ्यांनी कांदा पेरणी देखील केली.

मुगाचे पीक घेऊन लागवड झालेला कांदा अजून आलेला नसला नाही मात्र खास कांद्यासाठी शेती रिकामी ठेवून आघाऊ लागवड केलेला कांदा बाजारात येऊ लागला आहे.येथील बाजार समितीच्या आवारात आज सुमारे २०० क्विंटलच्या आसपास २० वाहनातून कांदा विक्रीला आला होता.या कांद्याला १४०० ते ४१०० दर मिळाला. लाल कांद्याची आवक सुरू झाली असली तरी बेमोसमी पावसाने मोठे नुकसान झाल्याने हे प्रमाण अत्यल्प असून दुय्यम प्रतीचाच कांदा बाजारात येत आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यापासून लाल कांद्याची मोठी आवक सुरू होईल, असे बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी सांगितले. यंदा वेळेत पाऊस झाल्याने आगाप खरीप लागवडी झाल्या असून प्रामुख्याने मालेगाव, चांदवड, देवळा, नांदगाव, येवला तालुक्यांत खरीप कांदा लागवडी वाढल्या. सुरवातीच्या टप्प्यात कमी पर्जन्यमान व काढणी काळात झालेला मुसळधार पावसामुळे कांदा लागवडीचे नुकसान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT