Gokul Milk  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gokul Milk Rate : ‘गोकूळ’च्या म्हैस, गायीच्या दूध खरेदीदरात २ रुपये वाढ

या दूध खरेदी दरवाढीमुळे दररोज सरासरी ३० लाख रुपये म्हणजेच प्रतिमहिना ९ कोटी रुपये रक्कम ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना दूधबिलापोटी अतिरिक्त मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Agrowon

Gokul Milk Rate Update कोल्हापूर : ‘‘कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकूळ) म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ (Milk Rate) रुपये वाढ केली आहे.

‘गोकूळ’शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय दूध खरेदी दरा‍त शनिवारपासून (ता.१) वाढ करण्यात आली. संचालक मंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला,’’ अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.

या दूध खरेदी दरवाढीमुळे दररोज सरासरी ३० लाख रुपये म्हणजेच प्रतिमहिना ९ कोटी रुपये रक्कम ‘गोकुळ’च्या दूध उत्पादकांना दूधबिलापोटी अतिरिक्त मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

११ फेब्रुवारीपासून म्‍हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस. एन. एफ प्रतीचे दुधास प्रतिलिटर रुपये ४९.५० दर राहील. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतीचे दुधास प्रतिलिटर रुपये ३७.००असा दर राहणार आहे.

पाटील म्हणाले, ‘‘सध्या गोकुळचे दैनंदिन दूध संकलन सरासरी १५ लाख लिटर्स असून यापैकी म्हैस दूध ८ लाख ५० हजार लिटर्स व गाय दूध ६ लाख ५० हजार लिटर्स इतके आहे. दरम्यान दूध खरेदी दरवाढीचे सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT