Cashew Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : काजू बीला प्रतिकिलो १२६ रुपये दर

Cashew Nut Rate : या वर्षी काजू हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागांत काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. काजू बीला प्रतिकिलो १२६ रुपये दर सध्या दिला जात आहे. मात्र काजू उत्पादकांकडून प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

या वर्षी काजू हंगाम १५ ते २० दिवस उशिराने सुरू झाला आहे. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात काजू बी परिपक्व होऊ लागली आहे.

या तालुक्यांत १० ते १५ दिवसांनी पूर्ण क्षमतेने काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात होईल. जिल्ह्यात काजू बी खरेदीसाठी बांदा बाजारपेठ ओळखली जाते. या बाजारपेठेत काजू बीला सध्या प्रतिकिलो १२६ रुपये दर दिला जात आहे. आठ दिवसांपूर्वी प्रतिकिलो १२२ रुपये दराने काजू खरेदी केली जात होती. परंतु त्यामध्ये चार रुपयांची वाढ झाली आहे.

उत्पादन घटीची शक्यता; तरीही दर कमी

नोव्हेंबरमध्ये थंडीचा अभाव होता. त्यामुळे या वर्षी काजूला चांगला मोहर आला नाही. त्याचा परिणाम काजू उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तरीदेखील काजू बीला १२६ रुपयेच दर मिळत आहे. बागायतदारांमध्ये नाराजी असून, प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, अशी मागणी बागायतदारांकडून सध्या सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT