Watermelon Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Watermelon Rate : कलिंगडास जागेवर १२ ते १३ रुपये दर

Khandesh Watermelon Market : खानदेशात कलिंगडाची आवक रखडत सुरू आहे. दर जागेवर किंवा शिवार खरेदीत १२ ते १३ रुपये प्रतिकिलो मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची आवक रखडत सुरू आहे. दर जागेवर किंवा शिवार खरेदीत १२ ते १३ रुपये प्रतिकिलो मिळत आहे. ढगाळ व पावसाळी वातावरणाचा फटका पिकास बसत असून, शेतकरी चिंतेत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी रमजान महिन्यातील मागणी व बाजार लक्षात घेऊन डिसेंबरच्या सुरुवातीलाच लागवड केली होती. लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांत पीक काढणीवर येत आहे.

जिल्ह्यात सध्या चोपडा, पाचोरा, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ आदी भागांत कलिंगड काढणीवर आहे. पाचोरा व अन्य भागात खरेदीसंबंधी सौदेही निश्चित झाले आहेत. १२ रुपये ५५ पैसे ते १३ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर देण्याचे खरेदीदारांनी म्हटले आहे.

रमजान पुढील महिन्यात सुरू होईल. त्यापूर्वी कलिंगडास उत्तर भारतासह अन्य भागांतून मागणी येत आहे. पुढील आठवड्यात ही मागणी अधिक राहील, असाही अंदाज आहे. रमजानचे पर्व सुरू होण्याच्या २५ ते ३० दिवसांपूर्वीच कलिंगड खरेदीस वेग येईल, असे संकेत आहेत. कलिंगड पीक पक्व झाल्यानंतर लागलीच त्याची विक्री करावी लागते. यामुळे सौदे लागलीच निश्चित होत असून, खरेदीची तयारीदेखील झाली आहे.

खानदेशात यंदा कलिंगड लागवडीत ४० टक्के घट झाली आहे. या महिन्यात लागवड बऱ्यापैकी झाली आहे. परंतु ही लागवड मागील वर्षाएवढी होणार नाही, अशी स्थिती आहे. लागवड कमी व विविध टप्प्यांत झाल्याने आवकही अखेरपर्यंत कमी राहील. उन्हाळ्यातील आवकही कमा राहू शकते, असा अंदाज आहे.

हवामानामुळे उत्पादक चिंतेत

मागील दोन दिवसांत विदर्भ व अन्य भागात गारपीट, पाऊस झाला आहे. तेथे पीकहानी झाल्याने खानदेशातील कलिंगड, केळी, पपई व अन्य रब्बी पिकांचे उत्पादकही चिंतेत आहेत. कारण पावसामुळे सौदे लांबलणीवर पडतील.

खरेदीदार पावसाळी स्थितीत कमी दर देतात. तसेच पाऊस आल्यास नुकसान अधिकचे होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकरी कलिंगड, केळीचे सौदे झाल्यानंतर लागलीच काढणी उरकून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

Nandani Math Elephant: नांदणी मठाची ‘महादेवी’ दुरावली

Pandharpur Flood: पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थिती, मंदिरे पाण्याखाली

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ची पडताळणी सुरूच ठेवा: मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT