Kabuli Chana Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kabuli Chana Rate : खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्यास ११ हजार रुपये

खानदेशात मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल ११ हजार रुपयांचा कमाल दर मिळत आहे.

Team Agrowon

Chana Market Update Jalgaon : खानदेशात मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल ११ हजार रुपयांचा कमाल दर मिळत आहे. त्याची आवक जळगावमधील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा बाजार समितीतही अत्यल्प आहे.

मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात मेक्सिकन किंवा डॉलर हरभरादेखील म्हटले जाते. त्याचे दर यंदा सुरुवातीपासून बरे आहेत. सुरुवातीला साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल असे दर होते.

मार्चअखेरीस त्याची आवक बाजारात सुरू झाली. आता दरात सुधारणा झाली आहे. चोपडा, अमळनेर, शिरपूर व शहादा या बाजार समित्या मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. कारण याच भागात त्याची लागवडदेखील केली जाते.

मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्याची अमळनेर येथील बाजारात या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान १०५०० व कमाल ११ हजार ५०० रुपये आणि सरासरी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मागील महिन्यात खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

प्रतिएकर सात ते नऊ क्विंटल उत्पादन

जळगाव जिल्ह्यात तापी, अनेर नदीकाठी धुळ्यातही अनेर व सातपुडा लगतच्या गावांत त्याची लागवड केली जाते. तर शहादा तालुक्यात गोमाई, सुसरी नदीच्या क्षेत्रात या हरभऱ्याची लागवड जानेवारीत केली जाते.

अनेक शेतकरी काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या केळीच्या बागांमध्ये लागवड करतात. टोकन पद्धतीने त्याची लागवड करून ठिबकद्वारे सिंचन केले जाते. यंदा प्रतिएकर सात ते नऊ क्विंटल एवढे उत्पादन हाती आले आहे.

रोज दीड हजार क्विंटलची आवक

सध्या मोठ्या काबुली हरभऱ्याची अमळनेर, चोपडा, शिरपूर येथील बाजारात मिळून रोज दीड हजार क्विंटल एवढी आवक होत आहे. सर्वाधिक आवक अमळनेरात होत आहे. रोखीने पैसे व लिलावातील पारदर्शकता यामुळे शिरपूर व अमळनेर येथील बाजारांना शेतकरी प्राधान्य देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT