Satara News : जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रावर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून पाच हमीभाव खरेदी केंद्रांवर १० हजार ७४४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. एकूण उत्पादन व झालेली खरेदी बघता हमीभाव केंद्राकडे नोंदणी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचेच जिल्ह्यात दिसत आहे. सोयाबीन नोंदणीसाठी शासनाकडून ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
खरीप हंगामातील दरवर्षी सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनचीच केली जाते. यंदाही जिल्ह्यात ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा टप्प्याटप्प्याने पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक चांगले येऊन दरही वाढल्याने चार पैसे जादाचे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र परतीच्या पावसाने नुकसान झाले होते.
दरम्यान, यंदा केंद्र सरकारने किमान हमीभाव चार हजार ८९२ रुपये जाहीर केला आहे. जिल्ह्यात सध्या ‘नाफेड’ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सातारा, फलटण, कऱ्हाड, मसूर, कोरेगाव या ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ते केंद्रावर शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील पाच केंद्रांवर आतापर्यंत १०,७४४ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरेगाव केंद्रावर नोंदणी व खरेदी झाली असून, कऱ्हाड केंद्रावर सर्वांत कमी खरेदी झाली आहे. ही झालेली खरेदी एकूण उत्पादनाच्या पाच ते सात टक्के नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांना सोयाबीनला हमी भाव मिळावा यासाठी शासनाकडून नोंदणीची मुदत वांरवार वाढण्यात आली आहे. मात्र केंद्रावरील अटी, वाहतूक यामुळे शेतकऱ्यांकडून केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. केंद्रावर सरसकट सोयबीन खरेदी केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
केंद्राचे नाव नोंदणीकृत शेतकरी संख्या सोयाबीन खरेदी (क्विंटलमध्ये)
सातारा १३९ शेतकरी १७४५
कोरेगाव ४६१ शेतकरी ५८८६.८०
कऱ्हाड २२ शेतकरी ००
मसूर १०० शेतकरी ७८७
फलटण २१२ शेतकरी २५४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.