Chakan Vegetable Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Market : चाकणच्या बाजारात ढोबळी मिरचीची १० टन आवक

Capsicum Rate : हिरव्या ढोबळी मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला ३५ ते ४० रुपये भाव राहिला. तर कांद्याची आवक दोन हजार क्विंटल झाली.

Team Agrowon

Pune News : येथील महात्मा फुले घाऊक बाजारात रविवारी (ता. १९) पालघर जिल्ह्यातून हिरव्या ढोबळी मिरचीची सुमारे दहा टन आवक झाली. हिरव्या ढोबळी मिरचीला घाऊक बाजारात प्रतिकिलोला ३५ ते ४० रुपये भाव राहिला. तर कांद्याची आवक दोन हजार क्विंटल झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला किमान वीस ते कमाल तीस रुपये भाव मिळाला.

बाजारात इतर भाजीपाल्यामध्ये बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यांतून हिरव्या मिरचीची पन्नास टन आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रति किलोला ४५ ते ५५ रुपये भाव मिळाला. मध्य प्रदेश राज्यातून हिरव्या वाटाण्याची सुमारे पन्नास टन आवक झाली.

हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात ३५ ते ४० रुपये प्रति किलोला भाव मिळाला. टोमॅटोची आवक तीस टन झाली. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला भाव पाच ते १२ रुपये मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

लसणाची आवक फक्त २५ क्विंटल झाली. घाऊक बाजारात लसूण दीडशे रुपये ते अडीचशे रुपये दर होते. बटाट्याची आवक तीन हजार क्विंटल झाली. बटाट्याला प्रतिकिलोला सुमारे बारा ते वीस रुपये भाव मिळाला.

बाजारात इंदूर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे तसेच स्थानिक काढणी केलेल्या नवीन बटाट्याची आवक होत आहे. बटाट्याला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात बटाटा प्रतिकिलोला तीस ते चाळीस रुपये भावाने विकला जात आहे. कोथिंबिरीची आवक वाढली होती. तर मेथीच्या जुड्यांचे भाव वाढले होते.

कोथिंबीर, मेथी पन्नास हजार जुड्यांची आवक

बाजारात कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजार जुड्यांची तर पालकच्या सुमारे ३ हजार जुड्यांची आवक झाली होती. या वेळी मेथीला एक जुडीला १० ते १४, कोथिंबिरीला दोन ते पाच रुपये, तर शेपूची पाच ते सात रुपये, तर पालक तीन ते सहा रुपये दर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT