Vegetables Rate Down : कोल्हापूर बाजारात पालेभाज्या दर घसरले; शेतकऱ्यांना फटका

White Onion : हंगामी पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे. बटाट्याची नवीन आवक सुरू झाली असली तरी अद्याप दर्जेदार माल बाजारसमितीत येताना पहायला मिळत नाही.
Vegetables Rate Down
Vegetables Rate Downagrowon
Published on
Updated on

Vegetables Rate Kolhapur : पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने पालेभाज्यांच्या किमती कोसळल्या आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये पोकळा, मेथी, पालक या पालेभाज्यांना चांगला दर मिळत होता, सध्या भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आले आहेत. मागणी कमी असल्याने या पालेभाज्यांचे दर आणखी घसरले आहेत. परिणामी, माल शिल्लक राहत असून भाज्या कचऱ्यात फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

भोगीनंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, दर कवडीमोल झाला आहे. कांद्याची आवक तेजीने वाढू लागली आहे. हंगामी पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे. बटाट्याची नवीन आवक सुरू झाली असली तरी अद्याप दर्जेदार माल बाजारसमितीत येताना पहायला मिळत नाही. थंडी कमी होईल तशी शेवग्याच्या शेंगा स्वस्त होत आहेत. सध्या दर दुपटीने कमी झाले आहेत.

Vegetables Rate Down
Vegetable Farming : अल्पभूधारक शेतकऱ्याने भाजीपाला शेतीतून साधली आर्थिक भरारी!

लसणाची नवीन आवक हळूहळू सुरू झाली आहे. त्याप्रमाणेच दरही कमी होत आहेत. फळबाजारात सर्वच फळांची आवक कमी होत आहे. हंगामी फळांची मागणी आणि आवक तेजीत आहे. अंजीरची आवक जोमात सुरू आहे. देशी द्राक्षांसह बाजारात स्थानिक पिकाऊ परदेशी द्राक्षांना मागणी चांगली आहे. लग्न मुहूर्त सुरू झाल्याने फूल बाजाराला चांगले दिवस आले आहेत. धान्य बाजारात ग्राहकांसाठी काहीसे अनुकूल वातावरण आहे. तूरडाळीच्या दरात कमालीची घट झाली आहे. त्याचबरोबर गहू, हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत.

प्रतिकिलो रुपये - भाजीपाला : टोमॅटो- १५ ते २०, दोडका- ५० ते ६०, वांगी- ४० ते ५०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची- ४० ते ५०, फ्लॉवर- २० ते ३०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा- ३० ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- ६० ते ८०, लिंबू- १५० ते ३०० शेकडा, गाजर- ५० ते ६०, बीन्स- ५० ते ६०, गवार- ८० ते १००, भेंडी- ५० ते ६०, ओला वाटाणा - ७० ते ८०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी- ४० ते ५०, दुधी- ३० ते ४०, भाज्या- ५ ते ७ पेंढी, कांदापात, मेथी- १० ते १५ रुपये, शेवगा - ८ ते १० रुपये नग.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १२० ते १५०, गुलाब - ३०० ते ३२०, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १२० ते १५०, आष्टर - १२० ते १५०.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू - ३७ ते ४४, हरभराडाळ - ७८ ते ८२, तूरडाळ - १२५ ते १३५, मूगडाळ - १०० ते ११०, मसूरडाळ - ७७ ते ७८, उडीदडाळ - १२० ते १२५, हरभरा- ७८, मूग- ९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसूर- ७० ते ७२, फुटाणाडाळ - १०५ ते ११०, चवळी- ९० ते १२५ , हिरवा वाटाणा- १७५, छोला - १२० ते १५०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com