Hingoli News : चालू आर्थिक वर्षातील (२०२४-२५) पहिल्या सहामाहीत (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर) हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीची एकूण १ लाख ३० हजार २२६ क्विंटल आवक झाली. हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १३,०३७ ते १५,६८० रुपये दर मिळाले. गतवर्षी (२०२३) एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील १ लाख ७७ हजार ४६१ क्विंटलच्या तुलनेत यंदा हळदीच्या आवकेत ४७ हजार २३५ क्विंटलने घट झाली आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामेदव हळद मार्केटमध्ये हिंगोली जिल्हा तसेच शेजारील नांदेड, परभणी हे जिल्हे विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यांतून हळदीची आवक होते. मोठ्या प्रमाणावर आवक येते. आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस हळदीची आवक घेतली जात आहे. जाहीर लिलावादवारे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल, मे, जून, जुलै या ४ महिन्यांत हळदीची आवक कमी राहिली. परंतु ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आवक वाढली आहे. यंदा हळदीला मे महिन्यात सर्वाधिक प्रतिक्विंटल सरासरी १४ हजार ६८० रुपये तर सर्वांत कमी ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल सरासरी १३,०३७ रुपये दर मिळाले. गतवर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांत हळदीची एकूण १ लाख ७७ हजार ४६१ क्विंटल आवक झाली होती.
त्यात एप्रिलमध्ये २३ हजार ३२० क्विंटल, मेमध्ये ३७ हजार १५० क्विंटल, जूनमध्ये २६ हजार ८२५ क्विंटल, जुलेमध्ये ४५ हजार १९२ क्विंटल, ऑगस्टमध्ये ३१ हजार ८१ क्विंटल, सप्टेंबरमध्ये १३ हजार ८९३ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी हळदीला एप्रिलमध्ये सर्वांत कमी प्रतिक्विटंल सरासरी ५ हजार ८९८ रुपये दर मिळाले होते. तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक प्रतिक्विंटल सरासरी १४ हजार ५८८ रुपये दर मिळाले होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
संत नामदेव हळद मार्केट
एप्रिल ते सप्टेंबर २०२४
हळद आवक व भाव स्थिती
महिना आवक (क्विंटल) सरासरी दर (रुपये)
एप्रिल १७,७०५ १५,५५४
मे २४,४५० १५,६८०
जून १५,९०० १४,५९०
जुलै १४,९२१ १३,९२७
ऑगस्ट २७,९५८ १३,०३७
सप्टेंबर २९,२९२ १३,१४७
मागील वर्षभरात हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला सरासरी दहा हजार रुपयांवर दर मिळाले. परंतु २०२३ मध्ये जिल्ह्यातील हळद लागवडीचे क्षेत्र कमी झाले होते. त्यामुळे बाजार समितीतील हळदीच्या आवकेत घट झाली आहे.नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.