women self help group members
women self help group members 
महिला

महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसाले

sandeep navale

पाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा सुरेश तावरे यांनी पूरक उद्योग म्हणून मसाला निर्मितीला सुरुवात केली.  बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सई महिला बचत गटांच्या माध्यमातून  २६ प्रकारचे मसाले तयार केले जातात. उत्तम चव आणि दर्जामुळे यामुळे मसाल्यांना राज्यभरातून वाढती मागणी वाढली आहे.  

ग्रामीण भागात एखादा प्रक्रिया उद्योग सुरू करताना अनेक प्रश्न मनात येतात. आपला प्रक्रिया उद्योग आर्थिकदृष्या यशस्वी होईल का ? उत्पादनांना पसंती मिळेल का ? असेच काहीसे प्रश्न पाहुणेवाडी (ता.बारामती,जि.पुणे) येथील सुवर्णा तावरे यांच्यासमोर होते. मात्र, बारामती येथील शारदा महिला संघाच्यावतीने दिले जाणारे प्रशिक्षण पूरक उद्योगाला चालना देणारे ठरले. सुवर्णाताईंना प्रक्रिया उद्योगासंदर्भात सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. यातून बचत गटाच्या उभारणीला सुरुवात झाली.  महिलांनी बाजारपेठेची गरज ओळखून शेतीपूरक उद्योगांना सुरुवात केली आहे.

बचत गटातून प्रक्रिया उद्योग  

सुवर्णाताईंनी गावातील सुशिक्षित महिलांना एकत्रित करून गटाच्या माध्यमातून पूरक उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरुवातीला दहा महिलांना एकत्रित आणून गटाचे फायदे आणि महत्त्व समजावून सांगितले. यातून  २०१० मध्ये वीस महिलांचा सई महिला बचत गट स्थापन झाला. गटातील बारा महिलांनी मसाले तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. मसाला प्रक्रियेसंदर्भात एक महिन्याचे प्रशिक्षण देखील घेतले. मसाले उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिन्याला प्रति महिला २०० रुपये बचत करण्यास सदस्यांनी सुरुवात केली. साधारणपणे एक वर्षात २० हजारांचे भागभांडवल उपलब्ध झाले. उपलब्ध निधीतून मसाला उद्योगासाठी लागणारा कच्चा मालाची पुण्यातील गुलटेकडी येथून  लवंग, मिरी, दालचिनी, धने, मिरची, खोबरे, वेलदोडे आदी घटकांची खरेदी सुरू झाली.   

विविध प्रकारांमध्ये पॅकिंग गटांमार्फत मसाले तयार केल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने आकर्षक पॅकिंग केले जाते. गटाने ग्राहकांनी मागणी लक्षात घेऊन पॅकिंगमध्ये बदल केले. प्रामुख्याने ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम व एक किलोमध्ये मसाल्याचे पॅकिंग केले जाते. मसाले दीर्घकाळ टिकण्यासाठी प्लॅस्टिक पाउचचा वापर केला जातो.  पॅकिंगवर मसाल्याची सर्व माहिती दिली जाते. गटाने लेबलसह पॅकिंग करणारे यंत्र घेतले आहे. योग्य आकर्षक पॅकिंगमुळे ग्राहकांना टिकवण क्षमता वाढली तसेच  विक्री करणे सोपे जाते.  प्रदर्शनात मसाल्याची विक्री पुण्यात दरवर्षी होत असलेल्या भिमथडी जत्रेत गटातर्फे मसाला विक्रीचा स्टॉल असतो. याशिवाय पवना थडी, मुंबईतील महालक्ष्मी सरस, काळाघोडा महोत्सव अशा  ठिकाणी मसाल्यांची विक्री केली जाते. यातून गटाने राज्यातील विविध भागातील ग्राहक जोडले आहेत. साधारणपणे चार ते पाच दिवसांच्या जत्रेत गटाची किमान एक लाखांपर्यंत मसाल्याची विक्री होते. या काळात अनेक मान्यवरांनी  स्टॉलवर भेट देऊन गटाच्या उपक्रमांचे कौतुक केले आहे. गटातर्फे भिमथडी जत्रेमध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवणाच्या स्टॉलला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. 

विविध मसाल्यांची निर्मिती भागभांडवल कमी असल्याने महिला गटाने बॅंकेकडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. या रक्कमेतून मसाले तयार करण्यासाठी कांडप यंत्र, चमचे, टप, पॅकिंग यंत्र, वजन काट्याची खरेदी केली. योग्य प्रशिक्षण घेतले असल्याने गटातील सदस्यांनी मसाला निर्मितीला सुरुवात केली. सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची निवड करून त्याचे प्रमाण ठरवून ते एकत्रित कांडप यंत्रामध्ये टाकून बारीक केले जातात. साधारणपणे पाच किलो मसाला तयार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. गटाने परिसरातील बाजारपेठ लक्षात घेऊन  विविध प्रकारचे मसाले तयार करण्यास सुरुवात केली.  पंचक्रोशीतील ग्राहकांचा या मसाल्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने गटाने विविध प्रकारच्या मसाल्यांच्या निर्मितीला सुरुवात केली. सध्या गटांच्या माध्यमातून एकूण सव्वीस प्रकारचे मसाले तयार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने मटण मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला,काळा मसाला, दूध मसाला, सांबर मसाला, पाणीपुरी मसाला, कच्ची दाबेली मसाला, चिवडा मसाला, लोणचे मसाल्याचा समावेश आहे.  

मसाल्याला चांगली मागणी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गटाने वाजवी दरात  विक्री करण्याचे तंत्र अवलंबल्याने मसाल्याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. बारामती परिसरातील ग्राहक घरी येऊन मसाला खरेदी करतात. बारामती शहरासह माळेगाव, आंदोबावाडी, पाहुणेवाडी, पणदरे, सांगवी आदि भागात  गटाने तयार केलेल्या मसाल्यास चांगले ग्राहक आहेत. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मागणीनुसार गटातर्फे योग्य वेळेत  मसाल्यांची पोहोच दिली जाते. 

वाढली उलाढाल गटातर्फे गेल्या दहा वर्षापासून मसाले निर्मिती उद्योग सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी आर्थिक उलाढाल वाढताना दिसत आहे. सध्या या व्यवसायातून दर महिन्याला मसाल्यांची २५ ते ३० किलोची विक्री होत असून ४० ते ४५ हजार रुपयांची उलाढाल होते. यातून पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा गटाला मिळतो.

बचत गटांना प्रोत्साहन

सुवर्णा तावरे यांनी बारामती तालुक्यातील  विविध गावांच्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गट स्थापन करण्याबाबत प्रोत्साहन दिले. दारिद्र्य रेषेखालील महिलांचेही बचत गट स्थापन करून रोजगार मिळवून दिला आहे. सुवर्णाताईंनी स्वतः दहा बचत गट स्थापन केले आहेत. तसेच आंदोबावाडी, पाहुणेवाडी, शारदानगर, खांडज,माळेगाव या भागातील महिलांना बचत गट स्थापन करण्यास मदत केली आहे.  गटांच्या माध्यमातून मसाले, पापड, शिवणकाम, कापड व्यवसाय आदि उद्योगांना अर्थसाहाय्य व अनुदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते.  गटातर्फे लघुउद्योगाचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते.

कमीत कमी तेलामध्ये अधिक खमंगदार मसाला तयार करण्याकडे आमचा कल असतो. मिरची देठासह कांडप केल्याने मसाला अधिक चवदार होतो. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मसाल्यांमुळे राज्यभरातील ग्राहकांच्याकडून वाढती मागणी आहे.

— सुवर्णा तावरे,९६५७८५३३०० (अध्यक्ष, सई महिला बचत गट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT