Crop Advisory Agrowon
कृषी सल्ला

Crop Advisory : कृषी सल्ला ( राहुरी विभाग)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस (ता.२८ डिसेंबर ते १ जानेवारी) हवामान कोरडे राहील.

Team Agrowon

हवामान सारांश

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस (ता.२८ डिसेंबर ते १ जानेवारी) हवामान कोरडे राहील.

मका (Maize) : वाढीची अवस्था

मका पिकावरील लष्करी अळीचे (Army Worm) नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

कांदा

 कांदा पिकात खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. कांदा पोसण्याच्या अवस्थेत असल्याने खते देण्याचे टाळावे.

टोमॅटो

 टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असताना खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे व खताची मात्रा द्यावी.

भाजीपाला पिके

वांगी, मिरची, वेलवर्गीय भाजीपाला पिकाची तोडणी करावी.

गहू

 फुटवे फुटण्याची अवस्था, मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भावासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी प्रादुर्भाव दिसून येताच मेटारायझीम ॲनिसोपली ५ ग्रॅम.

 टीप ः या जैविक कीटकनाशकाची संध्याकाळी फवारणी करावी.

 प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक दिसून येताच, थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम.

हरभरा

-पिकास फांद्या फुटताना.

-घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रति लिटर पाणी

एच.ए.एन.पी.व्ही. १ मिलि.

प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक दिसून येताच, फवारणी प्रति लिटर पाणी फ्ल्युबेंडीअमाईड (४८ प्रवाही) ०.२ मिलि.

तूर

 शेंगा भरण्याची अवस्था

 शेंगा पोखरणाऱ्या व पानाफुलांची जाळी करणाऱ्या (मरूका) अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी इंडोक्झाकार्ब (१७.८ ईसी) ०.७ मिलि किंवा ईमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ ईसी) ०.३ मिलि.

करडई

 मावा किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

 मेटारायझीम ॲनिसोपली ५ ग्रॅम किंवा

 ॲसिटामिप्रीड (२०% इ.सी.) ०.२ मिलि.

रब्बी ज्वारी

 ओंबी तयार होण्याची अवस्था

 पाण्याच्या उपलब्धतेनुसार तिसरे पाणी द्यावे व पक्ष्यांपासून संरक्षण करावे.

 वाढीच्या अवस्थेत ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील अन्नरस शोषतात. त्यांच्या शरीरातून पाझरलेल्या मधासारख्या गोड चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पिकाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी उत्पादनात घट होते. या किडीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ४ या प्रमाणात लावावे.

 प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क (५% ) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ५ मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणात करावी.

 मावा किडीच्या रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मिलि.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT