Crop Advisory Agrowon
कृषी सल्ला

Crop Advisory : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी सल्ला

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाने सोयाबीन, भुईमूग, ऊस, हरभरा, तूर आणि बटाटा या पिकांसाठी पुढील सल्ला दिला आहे.

Team Agrowon

सोयाबीन (Soybean) प्रखर सूर्यप्रकाशात वाळवावे. शक्य असल्यास पाच टक्के कडुनिंबाची पाने सोयाबीन साठवताना धान्यात मिसळावीत. सोयाबीन ओलसर आणि दमट ठिकाणी साठवू नये. 

भुईमूग (Groundnut) पीक काढणीच्या वेळी झाडे उपटल्यानंतर शेंगांची ताबडतोब तोडणी करावी.

साधारणपणे चार ते पाच दिवस उन्हामध्ये शेंगा वाळवण्यासाठी ठेवाव्यात. म्हणजे शेंगाचा ओलावा पाच ते दहा टक्के येईपर्यंत वाळवाव्यात आणि गोदामात साठवून ठेवाव्यात. 

वाफसा आल्यानंतरच बागायती हरभऱ्याची पेरणी करावी. पेरणीसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणास प्राधान्य द्यावे. सुधारित वाणांपैकी विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम या वाणांची निवड करावी. ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास चोळावे जेणेकरून संभाव्य बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळेल. २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान बागायती हरभऱ्याची पेरणी करावी. 

पूर्व हंगामी ऊस लागवड करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींची निवड करावी. लागवडीपूर्वी बेण्यास  बेणे प्रक्रिया करावी. पूर्व हंगामी उसात आंतरपीक म्हणून बटाटा, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, कांदा व लसूण यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करावी. 

रब्बी हंगामासाठी बटाटा या पिकाच्या लागवडीकरिता कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंदुरी, कुफरी सूर्या, कुफरी पुखराज इत्यादी जातींचा वापर करावा. 

रब्बी हंगामासाठी वाटाणा च्या लागवडीकरिता बोनव्हिला, अरकेल, फुले प्रिया इत्यादी वाणांचा वापर करावा. 

तूर पिकात अति पावसामुळे पाणी साठल्यास काही ठिकाणी झाडे पिवळी पडत असल्यास एक टक्का मायक्रोग्रेड दोन शंभर मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून दोन वेळा पंधरा दिवसांच्या अंतराने फवारावे. वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसतात रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाचा प्रसार कोळी या कीटकांद्वारे होतो त्यामुळे कोळी किटकाच्या नियंत्रणासाठी शिफारशीत उपाययोजना कराव्यात.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance: केळी, आंब्याला हवामान आधारित विमा परतावा मंजूर

Agriculture Irrigation: ‘विष्णुपुरी’तून दोन पाणीपाळ्या मिळणार

Environment Protection: झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले !

Satara District Bank: सातारा जिल्हा बॅंकेचे कामकाज उल्लेखनीय : बाबासाहेब पाटील

Dairy Development Project: विदर्भ, मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT