आंब्यावरिल तुडतुडे 
कृषी सल्ला

असे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रण

डॉ. आनंद नरंगलकर, डॉ. अंबरीष सणस

लांबलेल्या पावसामुळे आंबा पिकातील पालवीचा कालावधी लांबलेला आहे. कोकण विभागामध्ये आंबा बागांमध्ये तुरळक प्रमाणात मोहोर येण्यास सुरुवात झालेली आहे. येथील उष्ण व दमट हवामान आंब्यावरील कीड व रोगांच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे आंब्याचे आर्थिकदृष्ट्या उत्पादन हे सर्वस्वी कीड व रोगांच्या व्यवस्थापनाशी निगडित आहे.   बदलत्या वातावरणात आंबा पिकावर वेगवेगळ्या किडींचे प्रमाण वाढत आहे. सर्वसाधारणपणे आंब्याच्या पालवी अवस्थेपासून ते फळ काढणीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येतात. त्यानुसार नियंत्रणाचे उपाय करावेत. तुडतुडे

  • या किडीचा प्रादुर्भाव आंब्याची पालवी, मोहोर आणि कोवळ्या फळांवर आढळून येतो.
  • पिले व प्रौढ आंब्याच्या कोवळ्या पालवीमधून, मोहोरामधून आणि कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात, परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते.
  • पिले आणि तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळ्या रंगाच्या (कॅपनोडियम) बुरशीची वाढ होते व झाड काळे पडते, यालाच खार पडणे असे म्हणतात.
  • तुडतुड्यांची आर्थिक नुकसान संकेत पातळी १० तुडतुडे प्रति पालवी किंवा मोहोर.
  • नियंत्रण किडींचे निरीक्षण घेऊन आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावरच फवारणी करावी. पहिली फवारणी (प्रति लिटर पाणी). पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मिली प्रति लिटर फवारणी आंबा बागेमधील हापूस तसेच रायवळ जातीच्या सर्व झाडांवर तसेच त्यांच्या खोडांवर करावी, ज्यामुळे खोडांवर सुप्तावस्थेत असलेले तुडतुड्यांचे नियंत्रण होईल. दुसरी फवारणी (बोंडे फुटताना) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (८० टक्के) २ ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझीम अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) ब्यूप्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) १ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही)- ०.३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) थायामेथॉक्झाम (२५ टक्के) डब्लूडीजी ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिली किंवा लॅम्बडा सायहेलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली प्रति लिटर पाणी सहावी फवारणी (पाचव्या फवारणीनंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या  नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे गंधक (८० टक्के) २ ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझीम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. टीप १. मोहोर अवस्थेत मधमाशांना व मित्रकीटकांना हानिकारक ठरतील अशा कीटकनाशकांचा वापर टाळावा. २. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीटकनाशकांचा समंजस वापर करावा.   संपर्क ः  डॉ. आनंद नरंगलकर, ९४०५३६०५१९ डॉ. अंबरीष सणस, ९९६०३३२३७० (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    POCRA Project: ग्रामपातळीवर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : विजय कोळेकर

    Dairy Processing Technology: दूध प्रक्रियेतील मेम्ब्रेन फिल्ट्रेशन तंत्रज्ञान

    Goat Farming Success: शेळीपालनातून आम्ही झालो स्वावलंबी

    Marathwada Earthquake: मराठवाडा पुन्हा हादरला! हिंगोलीत ४.७ रिश्टरचा भूकंप, नांदेड, परभणी, यवतमाळला धक्के

    Pune Fruit Market: तीव्र उन्हाळ्यात द्राक्ष, लिंबांना वाढती मागणी

    SCROLL FOR NEXT