वांग्यामधील शेंडे, फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण 
कृषी सल्ला

वांग्यामधील शेंडे, फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

शेंडे व फळ पोखरणारी अळी या किडीचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी ठिपके असतात. अळ्या गुलाबी रंगाच्या असतात. वर्षभरात ८ ते १० पिढ्या पूर्ण होतात. ही कीड वर्षभर कार्यक्षम असते.

डॉ. संजोग बोकन,   डॉ. मिलिंद सोनकांबळे

नुकसानीचा प्रकार : 

  • अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यात, फुलात किंवा फळात शिरून उपजीविका करते.
  • अळी पानाच्या मुख्य शिरांतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. 
  • अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात.
  •  पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडते.
  •  लहान फळांमध्ये अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडके आहे की नाही हे ओळखणे अवघड जाते. 
  • अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते विष्ठा आतच सोडते.
  • नियंत्रण उपाय  

  • आर्थिक नुकसान पातळी ः ५ टक्के शेंड्यांचे किंवा फळांचे नुकसान
  • अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. 
  • फवारणी  ः प्रति लिटर पाणी
  •  इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.५ मिलि किंवा
  • थायोडिकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा
  •  पायरिप्रॉक्सीफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) १ मिलि किंवा
  •  क्लोरअँट्रानिलिप्रोल (१८.५ एसी) - ०.४ मिलि
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन   

  • कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास लगेच तोडून नष्ट करावीत.
  •  पीक फुलोऱ्या येण्याअगोदर एकरी ४ कामगंध सापळे किंवा नरसाळा सापळे लावावेत.
  • नर पतंग आकर्षित होऊन अडकतात. नर मादीचे मिलन होत नाही, पुढील पिढी निर्माण होण्यास अडथळे येतात.
  • एकरी ट्रायकोग्रामा चिलोनिस प्रजातीचे ट्रायकोकार्ड २-३ लावावेत.
  • ॲझाडीरॅक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • - डॉ. संजोग बोकन,   ९९२१७५२००० (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

    PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

    Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

    River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

    Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

    SCROLL FOR NEXT