weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale 
कृषी सल्ला

काही ठिकाणी चांगला पाऊस; काही ठिकाणी उघडीप

डॉ. रामचंद्र साबळे

या आठवड्याच्या सुरुवातीपासून बुधवारपर्यंत (ता.१६) महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टी भागावर १००० ते १००२ इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भाच्या काही भागात विस्तृत तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश व ईशान्य भारतावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे उत्तर दिशेने वाहतील. त्यामुळे या आठवड्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात चांगल्या पावसाची शक्यता राहील. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ऑगस्टअखेरीस सरासरीच्या तुलनेत अधिक तर काही जिल्ह्यांत सरासरी एवढा पाऊस झाला आहे. तर काही जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यांतील पावसाची कमतरता भरून निघेल, अशी स्थिती आहे. ईशान्य मान्सून सुरू होण्यास थोडाच कालावधी बाकी आहे. गुरुवार (ता.१७) रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन दिशेतही बदल होईल. कोकण  या आठवड्यातील काही दिवशी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ते ५० मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३५ ते ४० मिमी तर उत्तर कोकणातील रायगड व पालघर जिल्ह्यात ३० ते ३२ मिमी, ठाणे जिल्ह्यात २५ ते ४० मिमी पावसाची शक्‍यता राहील. कोकणात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहण्यामुळे पावसाचा जोर साधारणच राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणात २३ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७८ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  या आठवड्यात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत ३० ते ५० मिमी व नंदूरबार जिल्ह्यात ५२ ते ५५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६८ टक्के राहील. मराठवाडा  या आठवड्यात काही दिवशी उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात ३६ ते ५० मिमी तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४० ते ५० मिमी पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र काही दिवशी २० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात ४ किमी, नांदेड जिल्ह्यात ८ किमी, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ११ ते १२ किमी तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत १४ ते १५ किमी राहील. कमाल तापमान नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के तर दुपारची ५५ ते ६५ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांत काही दिवशी ४५ ते ५० मिमी तर वाशीम जिल्ह्यात २७ ते ३३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १० ते ११ किमी राहील. कमाल तापमान अमरावती, अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के तर दुपारची ६५ ते ६८ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ३५ ते ५० मिमी तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ ते ३५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६३ टक्के राहील. पूर्व विदर्भ  गोंदिया जिल्ह्यात काही दिवशी १८ ते २१ मिमी तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २५ ते २९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ३४ ते ४२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ईशान्येकडून तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किमी इतका कमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ३६ ते ३७ अंश सेल्सिअस तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. काही जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ तर काही जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ५९ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात २५ ते ४५ मिमी, सांगली जिल्ह्यात ३० ते ३५ मिमी, सातारा जिल्ह्यात ३३ ते ३७ मिमी, सोलापूर जिल्ह्यात २९ ते ४९ मिमी, पुणे जिल्ह्यात ३४ ते ३५ मिमी आणि नगर जिल्ह्यात ३५ ते ५४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते ११ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९७ टक्के तर दुपारची ६० ते ७० टक्के राहील. कृषी सल्ला 

  • कोरडवाहू क्षेत्रात रब्बी ज्वारी लागवडीसाठी उतारास आडवे सारे पाडावेत. त्यामुळे पावसाचे पाणी साऱ्यांमध्ये साठेल व जमिनीत खोल मुरेल. त्या ओलीवर गोकूळ अष्टमीच्या दरम्यान रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास उपलब्ध ओलाव्याचा फायदा होईल.
  • तूर पिकांस फुले येऊ लागताच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय केल्यास संभाव्य नुकसान टाळले जाईल.
  • पावसात उघडीप होताच, घेवडा पिकाची काढणी करावी.
  • खरीप बाजरीची काढणी करून पावसात उघडीप होताच मळणी करावी.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT