प्राथमिक पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क 
कृषी सल्ला

प्राथमिक पीक संरक्षणासाठी निंबोळी अर्क

कडुनिंबाच्या बियांमध्ये ॲझाडिरॅक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल असे अनेक महत्त्वाचे रासायनिक घटक आहेत. हे घटक किडींच्या नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका निभावतात.

खुशाल जवंजाळ, पी. पी. पाटील

पिकांच्या किडीपासून संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. रसायनांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्याच प्रमाणे किडींमध्ये या रसायनांविषयी प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. यातील प्रभावी म्हणजे निंबोळी अर्काचा होय. कडुनिंबाच्या बियांमध्ये ॲझाडिरॅक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल असे अनेक महत्त्वाचे रासायनिक घटक आहेत. हे घटक किडींच्या नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत : १) कडुनिंब झाडाखाली पडलेल्या व चांगल्या पिकलेल्या पिवळ्या निंबोळ्या एकत्र जमा कराव्यात. २) गोळा केलेल्या निंबोळ्यांची साल वेगळी करून बियांचा गर स्वच्छ धुऊन घ्यावा. ३) साल व गर काढलेल्या निंबोळीच्या बिया चांगल्या सुकवून कोरड्या जागी साठवून ठेवा. ४) चांगल्या सुकवून घेतलेल्या बियांची बारीक पावडर करून घ्यावी. फवारणीच्या आधी एक दिवस सायंकाळी पाच किलो बारीक केलेली निंबोळी भुकटी नऊ लिटर पाण्यात भिजत टाकावी. सोबतच एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबण चुरा वेगळा भिजत टाकावा. ५) दुसऱ्या दिवशी सकाळी भिजत टाकलेल्या निंबोळीचा अर्क चांगल्या स्वच्छ कपड्यामधून गाळून घ्यावा. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावा. नंतर हा अर्क दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे. ६) एका टाकीमध्ये ९० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये वरील दहा लिटर अर्क मिसळून तयार झालेले द्रावण योग्यरीत्या ढवळून घ्यावे. ७) अशा प्रकारे तयार झालेला ५ टक्के निंबोळी अर्क शिफारशीनुसार योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी. निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरल्यास जास्त परिणामकारक ठरतो.  फायदे -

  • निसर्गतः उपलब्ध असलेल्या निंबोळीच्या वापरामुळे अगदी नगण्य खर्चात घरच्या घरी नैसर्गिक कीटकनाशक तयार होते. उत्पादन खर्च ही कमी करता येतो.
  • मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने व देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा अनेक किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.
  • रासायनिक कीटकनाशकामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळता येतात.
  • निंबोळी अर्क फायदे : १) भक्षणरोधक म्हणून काम. २) अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. ३) पिकांपासून किडींना परावृत्त करते. ४) किडींच्या कात टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. ५) किडींचा जीवन कालावधी कमी होतो. ६) किडीचे अविकसित प्रौढ तयार होतात. ७) निर्मिती खर्च अत्यल्प असतो. ८) नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही. ९). निंबोळी अर्क बनवणे, हाताळणे व वापरणे सोपे आहे. १०) घातक किडींना प्रतिबंध, नियंत्रण करत असले तरी नैसर्गिक शत्रू, मित्रकीटकांसाठी फारसे हानिकारक ठरत नाही. ११) रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल राखता येईल. १२) निंबोळी अर्क, पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सूत्रकृमी, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात. संपर्क - खुशाल जवंजाळ, (वरिष्ठ संशोधन सहकारी) ८५३०८८७६९६ पी. पी. पाटील, (कापूस कीटकशास्त्रज्ञ) ९४२३४९८६४७ (कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

    Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

    Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

    Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

    Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

    SCROLL FOR NEXT