कृषी सल्ला
कृषी सल्ला 
कृषी सल्ला

कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा, बाजरी, भुईमूग, टोमॅटो

कृषी विद्या विभाग, राहुरी

ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यास सरंक्षित पाणी द्यावे. ऊस (पूर्वहंगामी)

  • अवस्था - लागवडीची पूर्वतयारी
  • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करतात. त्यासाठी पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी. मध्यम ते भारी जमिनीत १०० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. रानबांधणीअगोदर चांगले कुजलेले शेणखत जमिनीतून द्यावे (५० गाड्या प्रतिहेक्टरी).
  • बेणेप्रक्रिया - मॅलॅथिऑन ३०० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या द्रावणामध्ये १० मिनिटे बेणे बुडवून ठेवावे.
  • लागवडीसाठी को- ८६०३२, को- ९४०१२, को- ८०१४, फुले ०२६५ या वाणांची शिफारस आहे. एक डोळा पद्धतीत को- ८८१२१, को- ९४०१२ या वाणांचे निष्कर्ष चांगले आहेत.
  • कापूस अवस्था - बोंड धरणे करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर हेक्झाकोनॅझोल (५% ई.सी.) १.६६ मि.लि. तूर अवस्था - शेंगा भरणे शेंगा खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, एकरी २० पक्षिथांबे उभारावेत एचएएनपीव्ही ५०० मि.लि. प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू

  • गव्हाची पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी.
  • वेळेवर पेरणीसाठी एन.आय.ए.डब्लू.- ३०१ (त्र्यंबक), एन.आय.ए.डब्लू.- ९१७ (तपोवन), एन.आय.डी.डब्लू.- २९५ (गोदावरी), तसेच बागायती उशिरा पेरणीकरिता एन.आय.ए.डब्लू.- ३४, तर जिरायती पेरणीकरिता एन.आय.डी.डब्लू.- १५ (पंचवटी) या वाणांचा वापर करावा.
  • हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.
  • पेरणीच्या वेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
  • पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणीनंतर ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद द्यावे.
  • बाजरी अवस्था - दाणे भरणे जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार काढणी करून घ्यावी. भुईमूग अवस्था - शेंगा लागणे शेंगा भरत असताना जास्तीत जास्त आकार व वजन वाढण्यासाठी ७० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०), ५० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. हरभरा अवस्था - पेरणीपूर्व तयारी पेरणीपूर्व प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेन्डाझिम चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हीरीडी ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चोळावे. मिरची

  • अवस्था - फळे लागणे
  • मिरचीवरील लिफ कर्ल (चुरडामुरडा) हा विषाणूजन्य रोग असून, त्याचा प्रसार पांढरी माशी, फुलकिडे आणि कोळी या रसशोषक किडींमार्फत होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपे लागवडीनंतर २५ दिवसांनी पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस (५० ईसी) १ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी गरजेनुसार करावी.
  • फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच, फिप्रोनील (५ ईसी) १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • कोळी नियंत्रणासाठी, डायकोफॉल २ मि.लि. किंवा फेनाक्झाक्वीन १.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • वांगी

  • रोपे पुनर्लागवडीनंतर २० दिवसांनी प्रादुर्भावित शेंडे दिसून आल्यास ती काढून टाकावीत. फळे तोडणीच्या वेळेस कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% ईसी) ०.४ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (४५ एस.सी.) ०.५ मि.लि. पुढील फवारणी गरजेनुसार करावी.
  • टोमॅटो अवस्था - फळे लागणे

  • टोमॅटोवरील रसशोषक किडी (फुलकिडे, पांढरी माशी व मावा) नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी इमिडाक्लोप्रिड (१८ एस.सी.) ०.५ मि.लि. किंवा फिप्रोनील (५ ईसी) १.५ मि.लि.
  • फळे पोखरणाऱ्या अळीच्या व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. यापैकी एक कीटकनाशकांमध्ये मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम यापैकी एक बुरशीनाशक मिसळून प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • संपर्क ः ०२४२६ २४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

    Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

    Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

    SCROLL FOR NEXT