weekly weather
weekly weather 
कृषी सल्ला

थंडीत वाढ शक्य

डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. तोपर्यंत थंडीचे प्रमाण साधारणच राहील. मंगळवार (ता.७)पासून महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १०१४ व दक्षिण भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होताच थंडीच्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात होईल. या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. उत्तर भारतातील हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील, त्यामुळे थंडीचे प्रमाण अधिक असेल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे व ईशान्य भारतावरही हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढण्यामुळे तेथे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. वारे ईशान्य दिशेकडून येत असल्याने महाराष्ट्रातही थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. गुरुवार आणि शुक्रवार (ता. ९, १०) रोजी मध्य भारतातील हवेचे दाब १०१८ हेप्टापास्कल होताच थंडीचे प्रमाण आणखी वाढेल. ती स्थिती २३ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हवामानात स्थिरता येईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा वेग साधारणच राहील. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहण्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. सकाळी व दुपारीही थंडी जाणवेल. औरंगाबाद जिल्ह्यात उद्या अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होईल. हवामान बदलाचे परिणाम हिवाळ्यातही जाणवतील. कोकण  रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आज आणि उद्या अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ४ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९२ ते ९३ टक्के, तर पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांत ७७ ते ८४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ६० ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ५ कि.मी. राहील. मराठवाडा  उद्या औरंगाबाद जिल्ह्यात १२ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ते १८ अंश सेल्सिअस आणि जालना जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६४ टक्के राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन ती ३२ ते ४० टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ  कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर दुपारची ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ७० टक्के, तर भंडारा जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५५ ते ६९ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० ते ५० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत उद्या अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ९१ टक्के, तर दुपारची ४५ ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कृषी सल्ला 

  • ज्वारी, गहू, हरभरा, जवस, मोहरी पिकांत खुरपणी करून तणनियंत्रण करावे.
  • थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत.
  • कुक्कुटपालन शेडमध्ये रात्री बल्ब लावून तापमानात वाढ होईल अशी दक्षता घ्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

    Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

    Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

    Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

    Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

    SCROLL FOR NEXT