उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे पेरणीसाठी तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. महाराष्ट्रात तेलबियांची पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा, भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात. जमीन मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन लागवडीस योग्य असते. या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते. पूर्वमशागत जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे. बुरशीनाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर पेरणीसाठी वापरावे.
पेरणी पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीस उशीर होईल तशी उत्पादनात घट येते.
बियाणे प्रमाण पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. फुटके, कीडके, साल निघालेले, आकाराने लहान बी काढून टाकावे. पेरणीसाठी शिफारशीत वाणांचे खालीलप्रमाणे बियाणे वापरावे.
पेरणी अंतर, पद्धत भुईमूग लागवड ही पेरणी आणि टोकण पद्धतीने करता येते. पेरणी दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून करावी. उगवण झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात. इक्रिसॅट पद्धतीने लागवड यासाठी ट्रॅक्टर बेड यंत्राच्या साह्याने ९० सेंमी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत. किंवा पूर्वमशागतीनंतर १.२ मीटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने ३० सेंमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ९० सेंमी रुंदीचे रुंद गादीवाफे तयार होतात. वाफ्याची रुंदी १५ ते २० सेंमी ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून टोकण पद्धतीने भुईमूग लागवड करावी. खत व्यवस्थापन शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी नत्र २५ किलो आणि स्फुरद ५० किलो द्यावे. ही खतमात्रा युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्यावयाची झाल्यास, युरिया ५४ किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट ३१२.५ किलो द्यावी. सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून स्फुरद दिल्यामुळे भुईमुगास आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि गंधक ही अन्नद्रव्ये पिकास मिळतात. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रेसोबत ४०० किलो जिप्समचा वापर करावा. पेरणीवेळी २०० किलो जिप्सम आणि उर्वरीत मात्रा आऱ्या सुटताना द्यावी. आंतरमशागत
पाणी व्यवस्थापन
- डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०, (विषय विशेषज्ञ-कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर) - डॉ. रमेश भदाने, ७५८८८१३०५४ (प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, पंढरपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.