Farmer Dissatisfaction: राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली असली, तरी त्यातील कठोर अटी-शर्तींमुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्जवसुलीची योजना असल्याची भावना व्यक्त करत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे..योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जापैकी ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले कर्ज जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत माफ करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतरच दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अट मोठे आव्हान ठरत आहे..Farmer Issues: संपूर्ण व्यवस्थाच किडली; अन्नदात्याच्या जिवाचीही पर्वा नाही : आमदार रोहित पवार.विशेष म्हणजे, २०१९ मधील ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे..Farmer Issues: आकड्यांच्या पलीकडचे ‘मरण’.एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून अतिरिक्त रक्कम भरूनच उर्वरित लाभ मिळणार आहे. शेतकरी संघटनांच्या मते, कर्जफेड करण्याची आर्थिक क्षमता असती तर शेतकरी थकबाकीदारच झाले नसते. त्यामुळे ही अट वास्तववादी नसल्याची टीका होत आहे..नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभाची घोषणा करण्यात आली असली, तरी त्यासाठी सलग वर्षांतील नियमित कर्जफेड तसेच नव्याने घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..‘...अन्यथा ‘कर्जवसुली मोहीम’ ठरेल’दरम्यान, राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी योजनेतील अटी शिथिल करून सर्व थकीत पीककर्जाची संपूर्ण माफी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा ‘कर्जमुक्ती’च्या नावाखाली सुरू असलेली ही प्रक्रिया प्रत्यक्षात ‘कर्जवसुली मोहीम’ ठरेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.