Fuel Crisis: वाढती महागाई, इंधन टंचाईमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. .राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेनुसार अमरावती येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले..Farmer Issue: न्यायाधीशांना मोफत वीज; मात्र ‘शेतकऱ्यांना पाणी-वीज नाही; शिवसेनेची सरकारवर टीका.निवेदनाद्वारे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती तातडीने कमी करणे, पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करणे, महागाई नियंत्रणासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करणे, सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सक्षम करणे, अन्नधान्यासह खाद्यतेल व डाळींचा पुरवठा वाढविणे तसेच शेतकरी, कामगार व असंघटित क्षेत्रातील कष्टकरी वर्गासाठी विशेष दिलासा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली..Farmers Issue: कोकणचा ‘आक्रोश’.आंदोलनात ज्येष्ठ नेते कॉ. तुकाराम भस्मे, राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक सोनारकर, जिल्हा सचिव सुनील मेटकर, प्रा. साहेबराव विदळे, डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, आयटकचे सचिव निळकंठ ढोके, संजय मंडवधरे, उमेश बनसोड,.जयेंद्र भोगे, चंद्रकांत वडसकर, जितेंद्र कोरडे, प्रज्ञा बनसोड, लताताई हिवरकर, भूपतराव सोनवणे, पंचफुला शिंदे, अंबादास शेंडे, लताताई सोनारकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.