पिवळा मोझॅकची लक्षणे आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव 
कृषी सल्ला

सोयाबीन पीक सल्ला

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणही आहे. यामुळे सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडत असल्याचे दिसून आले. त्यामागे पुढीलपैकीकारणे असल्याचे दिसून येते.

डाॅ.सतीश निचळ, मंगेश दांडगे, राजीव घावडे

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सतत व अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणही आहे. यामुळे सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडत असल्याचे दिसून आले. त्यामागे सामान्यपणे पुढील पैकी एक किंवा अनेक कारणे असल्याचे दिसून येते. या वर्षी सोयाबीनमध्ये खोडमाशी व चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव सामान्यपेक्षा जास्त असल्यामुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. सध्या जमिनीत भरपूर ओलावा असल्यामुळे काही ठिकाणी विपरीत परिणाम आत्ताच दिसून येणार नाही. मात्र कालांतराने खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसावयास सुरुवात होईल. काही ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे नसल्यामुळे सोयाबीन रोपांच्या मुळांना जमिनीतील अन्नद्रव्य शोषताना अडथळा येत आहे. अनेक ठिकाणी लोहाची कमतरता असल्यामुळेही सोयाबीन पिवळे पडत आहे. महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशच्या काही भागात सोयाबीनच्या पिकावर मुख्यत्वे पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅक हे रोग दिसत आहेत. पिवळा मोझॅक या रोगामध्ये पानांवर पिवळे व हिरव्या रंगाची चट्टे दिसतात. हळूहळू ते पूर्ण झाडांमध्ये पसरत जाऊन संपूर्ण झाडाची पाने पिवळी पडतात. सोयाबीन मोझॅक या रोगामध्ये झाडांची पाने ही कडक पडतात. खालील बाजूने दुमडलेली दिसतात. या पानांमध्ये अधिक हिरवेपणा असतो. पानांचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसरही दिसून येतो. या दोन्ही रोगांचा प्रसार पांढरी माशी व मावा या रसशोषक किडींच्या माध्यमातून होतो. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य अँथ्रॅकनोज (पानांवरील, शेंगावरील बुरशीजन्य ठिपके) रायझोक्टोनिया रूट रॉट (मुळकुज/ खोडकुज) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. उपाययोजना 

  • अधिक पावसामुळे शेतात पाणी साचलेले असल्यास ते त्वरित बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
  • या वर्षी सोयाबीन पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव बहुतांश ठिकाणी आढळला. यामध्ये या प्रादुर्भावाचा विपरित परिणाम सध्या जमिनीत भरपूर ओलावा असल्यामुळे लगेच दिसून येणार नाही. मात्र कालांतराने खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसावयास सुरुवात होईल. खोडमाशींच्या नियंत्रणासाठी ज्या शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या आहेत. तिथे प्रादुर्भाव तुलनेने कमी राहून शेंगाचे प्रमाण बरे राहील. मात्र सतत येणाऱ्या पावसामुळे ज्यांना वेळेवर उपाययोजना करणे शक्य झाले नाही, तिथे प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त आहे. याचेच एक लक्षण म्हणजे पाने पिवळी पडून झाडे सुकण्यास सुरवात झालेली आहे.
  • अशा परिस्थितीत खोडमाशी, चक्रभुंगा सोबतच पाने खाणाऱ्या अळीचा ( विशेषतः उंटअळी व स्पोडोप्टेरा) प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून फवारणी प्रति लिटर पाणी

  • इन्डोक्साकार्ब ०.७ मिलि किंवा
  • इमामेक्टीन बेन्झोऐट (१.९ ई.सी.) ०.८४ मिलि किंवा
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल ०.३ मिलि.
  • सद्यस्थितीत बऱ्याच जमिनीतील अतिरीक्त ओलाव्यामुळे सोयाबीनच्या मुळाना जमिनीतील पोषणद्रव्ये शोषण्यात अडथळा होत आहे. जमिनीत अधिक ओल, सततचे ढगाळ वातावरण यामुळे सूर्यप्रकाशही कमी उपलब्ध होत आहे. परिणामी सोयाबीन पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होत असून सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. अशा पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, विषेशतः नत्र व पालाश यांचा पुरवठा करण्यासाठी १३ः०ः४५ (पोटॅशिअम नायट्रेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. काही भागात तुरळक ठिकाणी सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव यापुर्वीच झालेला होता. या रोगाच्या नियंत्रणाकरिता प्रारंभिक अवस्थेमध्ये शेतात विविध ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. यामुळे या रोगाचे वाहक व प्रसारक असलेल्या पांढऱ्या माशीला अटकाव होऊ शकेल.

  • या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी, पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
  • अशा शेतात पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता, भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर यांच्या शिफारशीनुसार फवारणी करावी.
  • प्रमाण प्रति लिटर पाणी.
  • बीटा सायफ्लुथ्रिन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१९.८१ टक्के ओ.डी.) (संयुक्त कीटकनाशक) ०. ७ मिलि किंवा
  • थायामेथोक्झाम अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि.
  • या फवारणीमुळे ज्यामुळे पांढऱ्या माशीसोबतच पाने खाणाऱ्या अळ्यांचेही नियंत्रण होईल.
  • सतत व अधिक पावसमुळे काही भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य ॲंथ्रॅकनोज (पानावरील / शेंगावरील बुरशीजन्य ठिपके), रायझोेक्टोनिया एरिएल ब्लाईट (करपा) व रायझोेक्टेानिया रूट राॅट (मुळकुज/खोडकुज) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. उपाययोजना ( फवारणी प्रति लिटर पाणी)

  • टेब्युकोनॅझोल (२५.९ ई.सी.) १.२५ मिलि किंवा
  • टेब्युकोनॅझोल (१० टक्के) अधिक सल्फर (६५ टक्के डब्ल्यू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा
  • पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यू. जी.) १ ग्रॅम किंवा
  • हेक्झाकोनॅझोल (५ टक्के इ.सी.) १.६ मिलि.
  • - डाॅ. सतीश निचळ, ९४२३४७३५५० (सोयाबीन शास्त्रज्ञ व प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती.) (टीप - लेखातील कीडनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठीचे आहे.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Sowing Tips: पेरणीपासूनच रोगमुक्त सोयाबीनसाठी प्रयत्न आवश्यक

    Goat Farming Business: भूमिहीन, अल्पभूधारक? नव्हे, या तर शेळीपालनातील उद्योजिका

    Farmer Loan Waiver: कर्जमाफी की शेतकऱ्यांची फसवणूक

    Agriculture Department Recruitment: बदल्यांचे ‘अर्थ’कारण

    Online Fertilizer Booking Issue: ऑनलाईन खत बुकिंगविरोधात रास्ता रोको

    SCROLL FOR NEXT