Nepal Flash Flood: नेपाळ- तिबेट सीमेवर आज (दि. २६ ऑगस्ट) अचानक आलेल्या भयंकर महापुराने हाहाकार उडाला. तिबेट सीमेला लागून असलेल्या नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भीषण महापुरामुळे सुमारे ४०० लोक बेपत्ता झाले आहेत. यात किमान १०५ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. या महाप्रलयात आतापर्यंत किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इमारती आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..तिबेटमधून नेपाळमध्ये वाहणाऱ्या 'भोटे कोशी' नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. या नदीत वितळलेला बर्फ कोसळून अचानक पूर आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नेपाळमधील रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांमधील अनेक भाग पाण्याखाली गेले. या पुरामुळे वाहने, पूल आणि पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. तसेच अनेक जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे..नेपाळ पर्यटन बोर्डने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे ३८४ पर्यटक बेपत्ता आहेत. यात २९१ परदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. यात १०५ भारतीय पर्यटक आणि ३७ अनिवासी भारतीय असून, त्यांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत संपर्क होऊ न शकलेल्या पर्यटकांमध्ये अमेरिका, मलेशिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स देशांच्या पर्यटकांचाही समावेश आहे..Krishna Flood Diversion : ‘कृष्णा फ्लड डायव्हर्शन’ सर्वेक्षणासाठी अखेर निविदा प्रक्रिया जाहीर.आपत्कालीन क्रमांकनेपाळमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी नेपाळमधील काठमांडू येथील भारतीय दूतावासाने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत.+977 985 131 6807+977 970 910 7500या दोन्ही आपत्कालीन क्रमांकांवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही संपर्क साधता येईल, असे सांगण्यात आले आहे. .Palghar Flood Control: पालघर जिल्ह्याला संभाव्य पूरस्थितीचा धोका; नियंत्रणासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय .रसुवा सीमा भागातून आलेल्या भयंकर महापुराचा फटका रसुवासह नुवाकोट, धादिंग आणि चितवनसह अनेक जिल्ह्यांना बसला. यात ९३ जण जखमी झाले आहेत. नुवाकोट येथील बिदूर नगरपालिका क्षेत्रात त्रिशूल नदीजवळ ४ मृतदेह आढळून आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. .या आपत्तीनंतर शोध आणि बचावकार्य करण्यासाठी नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचा हेलिकॉप्टर्ससह ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.