shivan cultivation useful in forestry 
 शिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड, कागद लगदा, प्लायवूड, लाकूड पेट्या, खेळणी, सजावटी व नक्षीदार शोभेच्या वस्तू, वाद्ये, होड्या व पालख्या बनविण्यासाठी होतो.वनशेती तसेच बांधावर लागवड करण्यासाठी हा वृक्ष उपयोगी आहे.       शिवण ही वेगाने वाढणारी देशी, बहुद्देशीय व पर्णपाती प्रजाती असून लॅमिएसी या कुटुंबातील आहे, याचे लाकूड दर्जेदार असते. शिवण  वृक्षाला घमर, कमेर, घामरी, शिवणी आणि व्हाइट टीक किंवा मेलीना म्हणून ओळखले जाते. नैसर्गिकरीत्या दक्षिण पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय/उपोष्णकटिबंधीय प्रदेशात अर्ध-पर्णपाती जंगलात  हा वृक्ष दिसून येतो. पूर्ण वाढलेला वृक्ष साधारणपणे ३० ते ३५ मीटर उंच होतो. शिवण लाकडाचा वापर फर्निचर, इमारती लाकूड, प्लायवूड, पार्टिकल बोर्ड, कागद लगदा, काडीपेटी निर्मितीसाठी केला जातो. याचबरोबर स्थानिक पातळीवर लाकडावरील कोरीव व नक्षी काम, पॅकिंग पेट्या, वाद्यनिर्मिती, लाकडी खेळणी आणि इंधन म्हणून वापर करतात. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजनामध्ये शिवण प्रजातीस ५० टक्क्यांपर्यंत अनुदान आहे. याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांना प्रस्ताव सादर करावा लागतो.      शिवण वृक्षाचे उगम स्थान दक्षिण-पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय/उपोष्णकटिबंधीय प्रदेश आहे. भारतामध्ये उष्णकटिबंधीय निम-सदाहरित, आर्द्र वने, दमट हवामानातील पानगळतीची वने व काही प्रमाणता शुष्क वनांत मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये याची पूर्व उप-हिमालयाच्या पर्वतीय प्रदेश, गंगेचा त्रिभुज प्रदेश, मैदानी भाग, अरावली पर्वताच्या टेकड्या, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण, पश्चिम महराष्ट्र आणि विदर्भामध्ये याची लागवड दिसून येते.        वर्णन 
 - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७   (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)